कंगना रनौत लोकसभेच्या मैदानात उतरणार

मतदारसंघ भाजप ठरवणार, कंगनाच्या वडिलांचे स्पष्टीकरण   

कंगना रनौत लोकसभेच्या मैदानात उतरणार

अभिनेत्री कंगना राणौत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता तिच्या वडिलांनीही ती पुढील लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, ती कुठून लढणार हे स्पष्ट झालेले नाही. निवडणूक कोठून निवडणूक लढवायची हे भारतीय जनता पक्ष ठरवेल असे तिचे वडील अमरदीप रनौत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

अमरदीप रणौत म्हणाले, कंगना २०२४ ची लोकसभा निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढणार आहे. कंगनाच्या वडिलांनी हे वक्तव्य कंगनाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भेटीनंतर केले आहे. कंगनाने १७ डिसेंबर रोजी कुल्लू येथील त्यांच्या निवासस्थानी भाजप अध्यक्षांची भेट घेतली. कंगनाने नुकतेच गुजरातमधील द्वारका येथे बोलताना सांगितले होते की, तिला लोकसभा निवडणूक लढवायची आहे. जर देवाचा आशीर्वाद असेल तर आपण नक्कीच निवडणूक लढवेल, असे ती म्हणाली. कंगना ही मूळ हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील आहे. ते हिमाचल प्रदेशातूनच निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

हेही वाचा..

लोकसभेच्या आणखी दोन खासदारांचे निलंबन; निलंबित खासदारांची संख्या १४३

पुजाऱ्याच्या हत्येचे कारण झाले स्पष्ट…

संसद घुसखोर प्रकरणातील आरोपी सागर शर्माच्या डायरीतून मिळताहेत धागेदोरे

संतापजनक! मुंबईत ६४ वर्षीय महिलेवर बलात्कार; आरोपीला ठोकल्या बेड्या

मंडी जिल्हा हा स्वर्गीय वीरभद्र सिंह कुटुंबाचा गड आहे. सध्या तिथे दिवंगत वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह मंडी लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. २०२१ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत त्या खासदार झाल्या. भाजप खासदार राम स्वरूप शर्मा यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. येथून पोटनिवडणुकीत भाजपने ब्रिगेडियर खुशाल सिंग यांना तिकीट दिले होते मात्र त्यांचा पराभव झाला.कंगना राणौत अनेक दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल कौतुकास्पद भाष्य करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचेही तिने अनेकदा जाहीर कौतुक केले आहे. १२ डिसेंबर रोजी हिमाचलमधील बिलासपूर येथे आयोजित आरएसएसच्या कार्यक्रमातही ती सहभागी झाली होती. संघाने तयार केलेल्या लोकांनी देशाची सत्ता हाती घेतली तेव्हा जे काम ७० वर्षात झाले नाही ते काम अवघ्या ८ ते १० वर्षात झाले असेही ति म्हणाली.

 

Exit mobile version