कंगना रनौत अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाला

फोटो शेअर करून दिली माहिती

कंगना रनौत अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाला

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत ही सध्या अयोध्यामंदिरात असून ती अयोध्या श्रीराम मंदिरात दर्शनाला पोहोचली आहे. कंगना रनौत हिने गुरुवार, २६ ऑक्टोबर रोजी अयोध्येतील राम मंदिरात आशीर्वाद घेतला. कंगना ही सध्या तिचा आगामी सिनेमा ‘तेजस’निमित्ताने विविध मंदिरांना आणि पवित्र स्थळांना भेट देत आहे. त्यानिमित्ताने कंगनाने अयोध्येत प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद घेतले आहेत.

 

कंगनाने तिच्या या अयोध्या राम मंदिरात दर्शन घेतानाचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी कंगनाने भगव्या रंगाची साडी परिधान केली होती. तिने दर्शन घेतानाचे फोटो शेअर करून कॅप्शन लिहिले आहे की, “मी श्री हरी विष्णूची भक्त आहे आणि आज मला त्यांचा इतका आशीर्वाद मिळाला आहे. विष्णुचा अवतार असलेला परम पूज्य, महान धनुर्धारी, अप्रतिम योद्धा, तपस्वी राजा, मर्यादापुरुषोत्तम श्री राम यांचे जन्मस्थानी मी नतमस्तक झाले. माझ्या ‘तेजस’ या चित्रपटात रामजन्मभूमीची विशेष भूमिका आहे. त्यामुळे रामलल्लाचे दर्शन करण्याची माझी इच्छा आज पूर्ण झाली.”

हे ही वाचा:

प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन

वकील सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड प्रकरणी तिघांना अटक

बीड मध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात १० जणांचा मृत्यू

प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचे आमंत्रण हे अहोभाग्य!

अभिनेत्री कंगना रानौत हिचा ‘तेजस’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. RSVP निर्मित तेजस या सिनेमात कंगना रनौत मुख्य भूमिकेत आहे. तेजस हा सर्वेश मेवाडा लिखित आणि दिग्दर्शित आणि रॉनी स्क्रूवाला निर्मित आहे. तेजस हा चित्रपट शुक्रवार, २७ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version