इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात भारताने इस्रायलला पाठींबा दर्शवला आहे. या संघर्षात बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत हिनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अभिनेत्री कंगना रनौतने इस्रायलच्या बाजूने समर्थन दिले आहे. इस्लामिक आतंकवादाच्या विरोधात असल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
कंगना रानौत हिने इस्त्राईलचे भारतातील राजदूत नाओर गिलोन यांची भेट घेतली आहे. दिल्लीतील इस्त्राईल दुतावासात जाऊन तिनं त्यांची भेट घेत ट्विटरवर पोस्ट केली आहे. याशिवाय इस्लामिक आतंकवादाच्या विरोधात इस्त्राईलच्या बाजूने आपले समर्थन दिले आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री कंगना ही नेहमीच तिच्या परखड वक्तव्यासाठी ओळखली जाते. यापूर्वीही अनेक मुद्द्यांवर तिने परखड मते मांडली आहेत. गेल्या काही दिवसांपासून इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षानं साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यात अनेक देशांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारतानेही पूर्वीचं भूमिका स्पष्ट केली आहे. काही बॉलीवूड सेलिब्रेटींनीही यापूर्वी या संघर्षावर भाष्य केले होते. अभिनेत्री स्वरा भास्करनं देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर मात्र जेवढ्या प्रमाणात या युद्धावर सेलिब्रेटींच्या प्रतिक्रिया येणे अपेक्षित होते तसे झालेले नाही. त्यामुळे चाहत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. तर दुसरीकडे हॉलीवूडमधील ५० हून अधिक कलाकारांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पत्र लिहून हे युद्ध थांबवावे अशी विनंती केली होती.
हे ही वाचा:
पॅलेस्टिनींना मानवतावादी मदत करत राहणार
युएन प्रमुखांकडून इस्रायल- हमासमध्ये युद्धविराम करण्याची मागणी
इस्रायली नागरिकाला बंदी बनवण्यासाठी हमासची ‘ऑफर’!
गरबा खेळताना भोवळ येवून तरुणाचा मृत्यू!
कंगना रानौत हिचा लवकरच ‘तेजस’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय तिचा भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित इमर्जन्सी नावाचा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.