भारतात ८० टक्के हिंदू त्यामुळेच पठाणही हिट होऊ शकतो!

अभिनेत्री कंपनाचे रोखठोक विधान

भारतात ८० टक्के हिंदू त्यामुळेच पठाणही हिट होऊ शकतो!

पठाण चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून प्रसिद्ध सिने अभिनेत्री कंगना राणावतने त्यावर शरसंधान केले आहे. पठाण हा चित्रपट पाहणे म्हणजे द्वेषावर प्रेमाचा विजय अशी टिप्पणी केली जात आहे. पण या भारतात ८० टक्के हिंदू राहतात, तिथे सर्वसमावेशकता आहे, प्रेम आहे त्यामुळेच पठाण नावाचा चित्रपटही यशस्वी होतो. त्यामुळे कुणाच्या प्रेमाने कुणाच्या द्वेषावर विजय मिळविला आहे, हे एकदा पाहावे, असे कंगनाने ट्विट करत म्हटले आहे.

शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटावरून गेले अनेक दिवस चर्चा सुरू आहे. या चित्रपटावर बंदी आणावी, त्यातील गाण्यावर कात्री फिरवावी अशा अनेक मागण्या झाल्या. आता हा चित्रपट लोक पाहात आहेत तर काही थिएटर ओस पडली आहेत, अशा परिस्थितीवर कंगनाने भाष्य केले आहे. कंगनाचे ट्विटर काही काळासाठी बंद करण्यात आले होते, तिथे ती पुन्हा दिसू लागली आहे.

हे ही वाचा:

९३ वर्ष जुनं आहे मुघल गार्डन…  जाणून घ्या कोणी बांधलं

बळजबरीने धर्मांतरे होत आहेत हा आक्रोश जनतेसमोर यायलाच हवा

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणतात, मी हिंदूच!

भारतीयांना अमेरिकेत जाणे सोपे होणार

तिने म्हटले आहे की, पठाण चित्रपटाची तिकिटे कोण घेत आहेत, कुणामुळे हा चित्रपट यशस्वी होत आहे. पण तो भारतीयांच्या प्रेमामुळे. याच भारतात ८० टक्के हिंदू राहतात. या चित्रपटात पाकिस्तान आणि आयसीस यांची प्रतिमा चांगली दाखविली असतानाही चित्रपटाला यश मिळत आहे. ही भारताची ओळख आहे. द्वेषाच्या पलिकडे जाऊन भारतीय एखाद्याला महान बनवतात. एकूणच द्वेषावर भारतीयांच्या प्रेमाने विजय मिळविला आहे.

कंगना म्हणते की, ज्यांना चित्रपटाविषयी प्रचंड आशा आहेत, त्यांना मी सांगू इच्छिते की, पठाण ही एक फिल्म आहे पण इथे गुंजणार आहे फक्त जय श्री राम.

कंपनाने आपल्या या ट्विटमध्ये पुढे लिहिले आहे की, सध्या अफगाणिस्तानात काय चालले आहे हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. नरकयातनाच लोक भोगत आहेत. त्यामुळे या चित्रपटाला अगदी योग्य नाव हवे होते इंडियन पठाण.

Exit mobile version