अभिनेत्री-खासदार कंगना राणौत आणि गीतकार जावेद अख्तर यांनी एकमेकांविरुद्धच्या मानहानीच्या खटल्यावरून त्यांचा दीर्घकाळ चाललेला कायदेशीर वाद अखेर मिटवला आहे. पाच वर्षे कोर्टरूममध्ये एकमेकांशी भांडल्यानंतर आज (२८ फेब्रुवारी) मुंबईतील वांद्रे येथील मॅजिस्ट्रेट कोर्टात दोघांनी आपला वाद मिटविला. कंगना राणौत यांनी जावेद अख्तर यांच्यासोबत एक फोटो काढत ही माहिती दिली.
कंगना राणौत यांनी फोटो शेअर करत म्हटले, आज जावेद जी आणि मी आमच्यातील कायदेशीर प्रकरण (मानहानी प्रकरण) परस्पर संमतीने सोडवले आहे. जावेदजी खूप दयाळू आणि सभ्य आहेत. त्यांनी माझ्या पुढील दिग्दर्शित चित्रपटासाठी गाणी लिहिण्यासही सहमती दर्शवली आहे,” असे कंगना राणौत यांनी पोस्टमध्ये लिहिले. यावेळी अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही हसताना दिसत आहेत.
दरम्यान, कंगना राणौत आणि जावेद अख्तर यांच्यातील हे प्रकरण २०१६ मध्ये सुरू झाले. त्यावेळी कंगना राणौत आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यामध्ये वाद होता. वाढत चाललेला वाद मिटवण्यासाठी रोशन कुटुंबाचे जवळचे मानले जाणारे जावेद अख्तर यांनी कंगनाला त्यांच्या घरी बोलावले आणि त्यांना हृतिकसोबतचे प्रकरण संपवण्यास आणि अभिनेत्याची माफी मागण्यास सांगितले. मात्र, कंगना राणौत यांनी यावर काही बोलल्या नाहीत.
२०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या वेळी कंगनाने हा मुद्दा उपस्थित केला. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी अनेक स्टार्सविरुद्ध विधान केले होते, ज्यामध्ये जावेद अख्तर यांचेही नाव होते. त्यांनी सांगितले की, जावेद अख्तर यांनी घरी बोलावून धमकी दिली.
हे ही वाचा :
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांची मोदी, बागेश्वर बाबांवर स्तुतीसुमने
तेलुगू भाषेतही आता ‘छावा’ची गर्जना!
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात मदरशात स्फोट; पाच जणांचा मृत्यू
५०० अधिकारी, ड्रोनचा वापर, डॉग स्क्वॉड, स्थानिकांची मदत…अखेर आरोपी दत्तात्रय गाडेला अटक!
त्या म्हणाल्या, जावेद अख्तर यांनी मला घरी बोलावून सांगितले कि राकेश रोशन (हृतिक रोशनचे वडील) आणि त्यांचे कुटुंब खूप मोठे आहे. त्यांची माफी माग नाहीतर कोठेही जाण्याची संधी मिळणार नाही, ते तुला तुरुंगात टाकतील, मग शेवटी एकच मार्ग असेल…आत्महत्येचा. जावेद अख्तर माझ्यावर खूप ओरडले, मी त्यावेळी थरथर कापत होते, असे अभिनेत्रीने सांगितले.
अभिनेत्रीचे हे विधान समोर आल्यानंतर जावेद अख्तर यांनी कंगनाविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला. जावेद अख्तर यांनी न्यायालयात सांगितले की, “कंगना राणौतने मुलाखतीत जे काही सांगितले ते खोटे आहे आणि खोटेपणाशिवाय दुसरे काहीही नाही.” फोन करून त्यांना बैठकीबद्दल सांगितले होते. ते पुढे म्हणाले, कंगना राणौत यांना वैयक्तिकरित्या ओळखत नाही, पण एक अभिनेत्री म्हणून त्यांचे नेहमीच आवडायचे, परंतु जेव्हा त्या ऐकणार नाहीत हे कळले तेव्हा विषय बदलून टाकला, असे जावेद अख्तर यांनी सांगितले. दरम्यान, पाच वर्षांपासूनचा वाद अखेर दोघांनी मिटविला आहे.