कंगनाने प्रियंका वाड्रांना ‘इमर्जन्सी’ चित्रपट पाहण्यासाठी केले आमंत्रित!

१७ जानेवारीला चित्रपट होणार प्रदर्शित 

कंगनाने प्रियंका वाड्रांना ‘इमर्जन्सी’ चित्रपट पाहण्यासाठी केले आमंत्रित!

अभिनेत्री कंगना राणौत यांचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. कंगना राणौतने या चित्रपटात पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचा नुकताच टीजर समोर आला असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची सर्वजण वाट पहात आहेत. याच दरम्यान, कंगना रणौत यांनी हा चित्रपट पाहण्यासाठी काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनाही आमंत्रित केले आहे.

‘इमर्जन्सी’ (आणीबाणी) हा चित्रपट १९७५ ते १९७७ या २१ महिन्यांच्या दीर्घ कालावधीची कथा आहे, ज्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अंतर्गत आणि बाह्य धोक्यांचा हवाला देत संपूर्ण देशात आणीबाणी जाहीर केली होती. हा चित्रपट १७ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. कंगना रणौत यांनी चित्रपट पाहण्यासाठी प्रियांका गांधी वाड्रा यांना आमंत्रित केले आहे. संसदेत त्यांच्या सहकारी खासदारांशी संवाद साधताना त्यांनी निमंत्रण दिल्याचे सांगितले.

कंगना रणौत म्हणाल्या, “मी खरे तर प्रियांका गांधीजींना संसदेत भेटले आणि मी त्यांना पहिली गोष्ट सांगितली, तुम्हाला  ‘इमर्जन्सी’ चित्रपट बघायला पाहिजे. तुम्हाला खूप आवडेल.” यावर विनम्रतेने प्रियांका गांधी वाड्रा यांनी ‘ठीक आहे, बघू.’ आता ते चित्रपट पाहायला जाणार की नाही हे पाहावे लागेल, असे कंगना रणौत पुढे म्हणाल्या. दरम्यान, १७ जानेवारीला ‘इमर्जन्सी’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अनुपम खेर आणि मराठी अभिनेता श्रेयस तळपदे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

हे ही वाचा : 

दहशतवादी मोहम्मद शाहिद खानची जामीन याचिका फेटाळली

गुणवत्ता सिद्ध करण्याची हीच नामी संधी !

संग्रहालयांच्या माध्यमातून सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन

हौशी शरीरसौष्ठव स्पर्धेत हरेकर, गडेकर, कडू, जाधव यांनी मारली बाजी

 

Exit mobile version