हिंदू विवाह पद्धतीला लक्ष्य करणाऱ्या ‘मान्यवरांवर’ कंगना रानौत संतापली

हिंदू विवाह पद्धतीला लक्ष्य करणाऱ्या ‘मान्यवरांवर’ कंगना रानौत संतापली

बाॅलीवूडचे सेलिब्रेटी आणि बाॅलीवूडच्या कलाकृती यांचे हिंदू धर्म आणि परंपरांना लक्ष्य करणे नवे नाही. ‘मान्यवर’ या कपड्यांच्या प्रसिद्ध ब्रँडने आपल्या नव्या जाहिरातीतून हेच केलेले दिसत आहे. बाॅलीवूड अभिनेत्री आलिया भट ही या जाहिरातीत मुख्य भूमिकेत दिसत आहे. पण हिंदू विविह पद्धतीवर टीका करणारी ही जाहिरात प्रेक्षकांच्या पसंतीस मात्र उतरताना दिसत नाहीये. समाज माध्यमांवरून या जाहिरातीवर चांगलीच टीका होताना दिसत आहे. अभिनेत्री कंगना रानौतने देखील इंस्टाग्रामवरून आलिया भट आणि जाहिरातदारांवर तोफ डागली आहे.

‘मान्यवर’ च्या नव्या जाहिरातीत हिंदू विवाह पद्धतीतील ‘कन्यादान’ या विधीला लक्ष्य करण्यात आले आहे. ‘बेटी को हमेशा पराया धन कहा जाता है’ असे संवाद या जाहिरातीतून समोर येतात. ‘कन्यादान’ नाही तर ‘कन्यामान’ असे म्हणत या जाहिरातीतून कन्यादानावर टीका करण्यात आली आहे. पण प्रेक्षकांना मात्र ही टीका चुकीची वाटत आहे.

हे ही वाचा:

संयुक्त राष्ट्रसंघ, क्वाड बैठकांसाठी मोदी अमेरिकेला रवाना

कितीही वॉर्ड पुनर्रचना करा, मुंबईसह अन्य महानगरपालिकेत आम्हालाच यश मिळणार

पंजाब राजस्थानच्या सामन्यात बॉलर्सचा बोलबाला

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचे ‘सव्वा’पसव्य

कन्यादान या शब्दाचा चुकीचा अर्थ काढून जाहिरातीतून टीका करण्यात आल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर या जाहिरातीच्या आणि आलिया भटच्या विरोधात मत व्यक्त करताना लोक दिसत आहेत. कन्यादान शब्दाचा विपर्यास करून जाणीवपूर्वक हिंदू धर्मातील विधींना लक्ष्य केले जात असल्याचे म्हटले जात आहे.

अभिनेत्री कंगना रानौत हिने देखील इंस्टाग्रामवरून आलिया भट आणि जाहिरातदारांवर टीकास्त्र डागले आहे. “धन हा शब्द वाईट नसून तुमचे मन वाईट आहे. धन हा शब्द अनेक प्रकारे वापरला जातो. ‘मैने रामरतन धन पायो’, ‘पुत्र धन’, ‘सौंदर्य आणि रूपाचे धनी’ हे खूप सामान्यतः वापरले जाणारे शब्द आहेत. ‘कन्यादान’ किंवा ‘पराया धन’ याचा अर्थ तुम्ही तुमच्या मुलीला विकताय असा होत नाही. तुमचा हा हिंदू विरोधी प्रोपोगांडा थांबवा”

Exit mobile version