हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री कंगना रानौत हिने पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. कंगना रानौत हिच्या २०१९ आणि २०२० सालातील मणिकर्णिका आणि पंगा या दोन चित्रपटांसाठी एकत्रितपणे हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. भारताचे उपराष्ट्रपती वेंकैय्याह नायडू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे.
कंगना रानौत हिला या आधी २००८ साली पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. फॅशन चित्रपटातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री म्हणून कंगनाला पुरस्कार मिळाला होता. तर त्यानंतर २०१४ आणि २०१५ साली क्विन आणि ‘तन्नू वेड्स मन्नू २’ या चित्रपटांसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
हे ही वाचा:
मला चुकीच्या पद्धतीने अडकवले जात आहे, वानखेडे यांनी लिहिले पत्र
‘सात अजुबे इस दुनिया के, आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हे’
नाशिकमधील शिवसैनिकांना पडला उद्धव ठाकरेंचा विसर!
कुणाल जानी कलानगरमधील मंत्र्याच्या जवळचा
यात आता २०१९ आणि २०२० सालच्या कंगनाच्या सादरीकरणासाठी मिळालेल्या पुरस्काराची भर पडली आहे. मणिकर्णिका या चित्रपटातून झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जीवनपट उलगडण्यात आला आहे. तर पंगा चित्रपट हा एका कबड्डीपटू खेळाडूची कथा आहे.
या व्यतिरिक्त या पुरस्कार सोहळ्यात शिवाजीराव गायकवाड उर्फ रजनीकांत यांना दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर सुशांत सिंग राजपूत याच्या छिछोरे चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला आहे. या सोबतच मनोज बाजपेयी आणि धनुषला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे.