बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या बेधडक शैलीसाठी ओळखली जाते. ही अभिनेत्री सोशल मीडियावर आपली मत देखील बेधडकपणे मांडताना दिसते आहे. परंतु, कंगनाची ही शैली ट्विटरला आवडलेली नाही. मंगळवारी ट्विटरने असहिष्णुता दाखवत कंगना रनौत हिच्या ट्विटरवर कायमस्वरुपी बंदी घातली आहे. ट्विटरच्या या कारवाईनंतर कू ऍप्प कंगनाच्या समर्थनात पुढे आले आहे.
आता जेव्हा ट्विटरद्वारे कंगनाचे खाते निलंबित केले गेले आहे, तेव्हा त्याचा स्वदेशी पर्याय असणाऱ्या ‘कू’ने या अभिनेत्रीचे जाहीर स्वागत केले आहे. कंगनाच्या विरोधात केलेल्या या कारवाईबाबत ट्विटरने म्हटले आहे की, अभिनेत्रीने ‘वारंवार नियमांचे उल्लंघन केल्याने’ त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
कूचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अप्रमेय राधाकृष्ण यांनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन कंगनाच्या पहिल्या कू पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यात तिने ‘कु आप घर है’ असं म्हटलं आहे. अश्या परिस्थितीत हे पोस्ट करुन अप्रमेयने अभिनेत्रीला ‘बरोबर’ असे म्हणत दुजोरा दिला आहे. आणि पुढे म्हटले की, ‘कू तिच्या घरासारखे आहे, तर बाकीची भाड्याने घेण्यासारखे आहेत’.
कूच्या या स्वागतामुळे कंगनाचे चाहते खूप खुश झाले आहेत. कंगना ट्विटरप्रमाणेच कू वरही खूप अॅक्टिव आहे. कू लाँच झाल्यानंतर लगेचच अभिनेत्री यात सामील झाली. या प्लॅटफॉर्मवर कंगनाचे अधिकृत पेज आहे आणि त्यावर तिचे ४ लाख ४९ हजार फॉलोअर्स आहेत.
ट्विटरच्या या कारवाईनंतर अभिनेत्री संतप्त झाली आहे आणि तिने म्हटले आहे की, या व्यासपीठाने तिची मते बरोबर असल्याचे सिद्ध केले आहे. ‘हे गोरे लोक स्वत:ला अश्वेत लोकांना गुलाम बनवण्यास पात्र मानतात’. सिनेमासह असे अनेक मंच आहेत. तथापि, ती अशा लोकांचा विचार करत आहेत जे हजारो वर्षांपासून अत्याचार, गुलामगिरी आणि सेन्सॉरशिपचा बळी होत आहेत आणि तरीही त्यांची वेदना संपत नाही.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारमधील समन्वयाच्या अभावामुळेच हा दुर्दैवी निर्णय
ठाकरे सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक
मराठा आरक्षण म्हणजे अल्ट्रा व्हायरस- अॅड. गुणरत्न सदावर्ते
स्वत:ला पुरोगामी म्हणणारे पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर गप्प का आहेत?
अलीकडेच पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाले आहे. ज्यानंतर कंगना टीएमसीविरोधात अनेक ट्विट करत होती. भाजपाला पाठिंबा देत कंगना उघडपणे टीएमसीवर निशाणा साधत होते. गँगरेपचा आरोप करत कंगनाने टीएमसीवर ट्विट केले होते, त्यानंतरच तिचे खाते निलंबित केले गेले आहे.