कांदिवलीत १८ ते २५ वयोगटातील नवीन मतदारांशी पंतप्रधान साधणार संवाद!

भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्याकडून कार्यक्रमाचे आयोजन

कांदिवलीत १८ ते २५ वयोगटातील नवीन मतदारांशी पंतप्रधान साधणार संवाद!

पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ जानेवारी रोजी नवीन मतदारांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील १८ ते २५ वयोगटातील नवीन मतदारांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत.भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत याची माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या २५ जानेवारी रोजी ५० लाख नवीन मतदार आणि तरुणांशी संवाद साधणार आहेत.२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधत पंतप्रधान मोदी नवीन मतदार तरुणांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदींशी संवाद साधण्यासाठी नव मतदार तरुणांना ही चांगली संधी आहे.भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्याकडून देखील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर व्हिडिओच्या माध्यमातून कार्यक्रमाची माहिती देत कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील १८ ते २५ वयोगटातील नव मतदार तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

हे ही वाचा:

DGCA ने एअर इंडियाला ठोठावला १.१० कोटींचा दंड!

ममता दीदीनंतर पंजाबचा सूर बदलला, पंजाबमधून आप- १३ जागांवर एकटाच लढणार!

सूर्या ठरला ‘टी- २० प्लेअर ऑफ दि इअर’

राहुल गांधींना सुरक्षा द्या, खर्गेंचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र!

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हणाले की, १८ ते २५ वर्षे वयोगटातील नवीन मतदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील नवीन मतदारांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत.उद्या सकाळी १० वाजता पारेख हॉल, मालाड पूर्व या ठिकाणी सर्वांना येण्याचे आवाहन केले.तसेच पंतप्रधान मोदींशी ऑनलाईन जोडून त्यांचे विचार आणि त्यांच्याशी थेट बोलण्याचा अनुभव घेण्याचे आवाहन आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे.

Exit mobile version