29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरविशेषभाजपला आत्मचिंतन करायला लावणारे निकाल!

भाजपला आत्मचिंतन करायला लावणारे निकाल!

हिंदुत्वावर जातीय समीकरणे आणि मुस्लिमांची एकजूट पडली भारी

Google News Follow

Related

एनडीएकडे सरकार स्थापनेसाठी बहुमत असले आणि भाजप हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला असला तरी, मागासवर्गीय आणि मुस्लिमांची एकजूट हिंदुत्वावर भारी पडल्याचे दिसत आहे. मोदी यांचे सरकार तिसऱ्यांदा आल्यास राज्यघटना आणि आरक्षण धोक्यात येईल, ही विरोधकांनी दिलेली घोषणा लाभार्थी मतदार, ‘सबका विकास-सबका विश्वास और सबका प्रयास’ या घोषणांवर भारी पडला. अयोध्येत राममंदिराची प्राणप्रतिष्ठा होऊनही येथे भाजपचा झालेला पराभव, हे सर्वांत मोठे उदाहरण मानता येईल.

हिंदी पट्ट्यातील उत्तर प्रदेशसह राजस्थान, हरियाणासह महाराष्ट्र व पश्चिम बंगालसारख्या राज्यांत आक्षरण वाचवण्यासाठी मागासवर्गीय आणि दलितांनी मुस्लिमांच्या साथीने एकजूट होऊन भाजपला स्वबळावर सरकार स्थापन करण्यापासून रोखले आणि ‘इंडिया’ गटाला त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठीही हातभार लावला. हेच या निकालाचे मुख्य सार आहे. शिवाय, भाजपचा अति आत्मविश्वास आणि वर्तमान खासदारांप्रति स्थानिक स्तरावर रोष, विरोधी पक्षांकडून महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाच्या केलेल्या आरोपांनी भाजपची समीकरणेच बदलवून टाकली.

आरोपांना उत्तर देण्यात अपयशी
सर्वांत मोठा पक्ष ठरूनही भाजपसाठी ३७० आणि एनडीएचे ४००चे पारचे स्वप्न धुळीस मिळाले. त्यामुळे भाजपला आता आत्मचिंतन करावे लागेल. मध्यप्रदेश, बिहार आणि दिल्लीतील भाजपच्या निकालांनीही काही संकेत दिले आहेत. भाजपने तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर राज्यघटना बदलेल, निवडणूक घेणार नाही आणि मागासवर्गीय-दलितांचे आरक्षण संपवून टाकेल, या विरोधी पक्षांच्या आरोपांना भाजप सडेतोड उत्तर देऊ शकले नाही.

हे ही वाचा:

‘चांगल्या कामासाठी हार्दिक शुभेच्छा’

बीआरएसची पराभवाची मालिका सुरूच!

उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशातील अंदाज चुकले

उत्तराखंडमध्ये ट्रेकिंगसाठी गेलेल्या चार ट्रेकर्सचा मृत्यू; १३ ट्रेकर्स बेपत्ता

विरोधी पक्षांनी जिंकला मुस्लिमांचा विश्वास
भाजपचे कार्यकर्ते स्थानिक स्तरावर विशेषतः उत्तर प्रदेशसह हिंदी पट्ट्यातील काही राज्यांमध्ये पक्ष कार्यकर्त्यांचे आरक्षण व राज्यघटना बदलण्याच्या आरोपांना उत्तर देण्यास अपयशी ठरले. मुस्लिम, मागासवर्गीय आणि दलितांची भाजपविरोधात एकजूट दिसली. ते भाजपला रोखू शकतील, हा विश्वास त्यांना वाटत होता. त्यांनी तोच प्रयत्न केला. त्यामुळे इंडिया आघाडी मुस्लिमांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी ठरला.

बूथसंघटन झाले उद्ध्वस्त
भाजपने लोकांशी संपर्क-संवाद नसलेल्या चेहऱ्यांना पुन्हा मैदानात उतरवले. भाजपने विक्रमी विजय मिळवणाऱ्यांचे तिकीट कापले. त्यामुळे काही ठिकाणी नाराजी होती. त्यामुळे कार्यकर्ते शांत होते. पहिल्या टप्प्यातील कमी मतदानाचे हेच कारण होते. बूथ-संघटन, जी भाजपची ओळख होती, ते उद्ध्वस्त झाले.

केवळ मोदींवर विश्वास, स्वतः उदासीन
पंतप्रधान मोदी यांच्या चेहऱ्यामुळे विजय मिळेलच, हा अतिविश्वास अनेक उमेदवारांना नडला. जनतेमध्ये रोष असतानाही काही खासदारांनी मेहनत घेतली नाही. त्यांनी केवळ मोदींवर विश्वास ठेवला. संघटनेच्या या अति आत्मविश्वासामुळे जातीय समीकरणे आणि मुस्लिमांच्या एकजुटीचा परिणाम दिसला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा