23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषअंबिका मसालेच्या अध्यक्षा कमल परदेशी यांचे निधन

अंबिका मसालेच्या अध्यक्षा कमल परदेशी यांचे निधन

वयाच्या ६३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Google News Follow

Related

अंबिका मसाले कंपनीच्या अध्यक्षा कमलताई परदेशी यांचे निधन झाले आहे. अंबिका उद्योग समूहच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या कमल परदेशी यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना ब्लड कॅन्सर झाला होता अशी माहिती समोर आली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात त्यांचे निधन झाले. दौंड तालुक्यातील खुटबाव या गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कमल परदेशी या पूर्वी शेतमजूर होत्या. त्यांचा शेतमजूर ते कोट्यवधींची उलाढाल असलेल्या अंबिका मसाल्याच्या अध्यक्षा असा थक्क करणारा प्रवास आहे. २००० साली खुरपणीच्या कामातून दररोज मिळणाऱ्या पैशातून त्यांनी मसाला व्यवसाय सुरू केला. कमल यांनी मसाल्याच्या व्यवसायाची सुरुवात आपल्या झोपडीतूनच केली. आज त्यांच्या मसाल्यांना परदेशात देखील मोठी मागणी आहे.

सुरुवातीला त्यांनी पुण्यातल्या सरकारी कार्यालयाबाहेर त्यांनी मसाले विकले. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर मुंबईतल्या प्रदशर्नांमध्ये आणि मग बिग बाझारमध्ये मसाल्यांची विक्री केली. आज जगभरात त्यांच्या मसाल्यांना मागणी आहे. आदर्श उद्योजिका सारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

हे ही वाचा:

पत्रकार परिषद सुरू असतानाचं दक्षिण कोरियाच्या विरोधी पक्ष नेत्यावर हल्ला

योगी सरकारचा मोठा निर्णय; स्कूल व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक!

भारत सरकारने ‘तहरीक-ए-हुर्रियत’ला दहशतवादी संघटना घोषित केल्याने पाकिस्तानचा जळफळाट!

‘अयोध्येला भेट द्या… तुम्हाला त्रेतायुगात गेल्यासारखे वाटेल’

जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल यांनीही कमल यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. नाबार्डच्या माध्यमातून जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल या मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी त्यांचा बचत गट अँगेला मर्केल यांना दाखवण्यात आला होता. त्यावेळी १४ हजार ५०० रुपयांचा चेक त्यांनी कमल यांना दिला होता. अँजेला मर्केल यांनी भेटीवेळी कमल यांना अपेक्षा काय विचारल्या होत्या. त्यावेळी आम्हाला बाजारपेठ उपलब्ध करुन द्या, असं कमल म्हणाल्या. त्यानंतर जर्मनीत अंबिका मसाल्याची विक्री होऊ लागली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा