लोकसभा निवडणुकीआधी मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या छिंदवाड्यातील सर्वांत निकटवर्तीय दीपक सक्सेना यांनी शुक्रवारी रात्री उशिरा भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी त्यांना सदस्यत्व दिले. दीपक सक्सेना गेल्या ४४ वर्षांपासून कमलनाथ यांच्यासोबत होते. दीपक हे चारवेळा काँग्रेसचे आमदार राहिले आहेत आणि मध्य प्रदेशातील सरकारमध्ये दोनवेळा मंत्रीही होते. त्यांना कमलनाथ यांचे ‘हनुमान’ संबोधले जायचे.
सक्सेना यांनी २०१८मध्ये छिंदवाडा जागेवरून विधानसभा निवडणूक जिंकली होती. मात्र कमलनाथ यांना विधानसभा निवडणुकीसाठी आमदारकीवर पाणी सोडले होते. कमलनाथ यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर छिंदवाड्यातून विधानसभेची पोटनिवडणूक जिंकली होती. २२ मार्च रोजी दीपक सक्सेना यांच्या मुलानेही भाजपचे सदस्यत्व घेतले होते. मुलाने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सक्सेना यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हाच ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात होती.
हे ही वाचा..
भारत मालदीवला पाठवणार आवश्यक वस्तू!
महायुतीचे ठरले! कल्याणमधून श्रीकांत शिंदे लोकसभेच्या रिंगणात
प. बंगालमध्ये एनआयएच्या पथकावर हल्ला
२७मार्च रोजी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी छिंदवाड्यात दीपक सक्सेना यांची भेट घेतली होती. आता छिंदवाड्यातील कमलनाथ यांचे बहुतांश निकटवर्तीय भाजपमध्ये सामील झाले आहेत.
नुकतेच छिंदवाडा नगरपरिषदेचे महापौर विक्रम अहाके यांनी भोपाळला पोहोचून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत छिंदवाडा नगरपरिषदेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.