दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नाही मंदिर!

कल्याण कोर्टाने मंदिराबाबत आदेश काढले

दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नाही मंदिर!

कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यासंदर्भात कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नसून मंदिर असल्याचे कल्याण कोर्टाने म्हटले आहे. याबाबत कल्याणमधील सत्र न्यायालयाकडून आदेश काढण्यात आले आहेत.

दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? असा वाद सुरु होता. मागील बऱ्याच काळापासून या प्रकरणार सुनावणी सुरु होती. अखेर या प्रकरणाचा आज निकाल लागला. कल्याण कोर्टाने आपला निकाल देत दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नसून मंदिर असल्याचे स्पष्ट केले. दुर्गाडी किल्ल्यावर मशीद असल्याचा काही जणांनी दावा केला होता. मात्र, हा दावा कोर्टाने खोडून काढत दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

हे ही वाचा : 

वक्फ बोर्डचा मनमानी कारभार, देशातील ९९४ मालमत्ता गिळल्या!

कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर ‘या’ बेस्ट बसेसचा मार्ग बदलला

कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

लालूप्रसाद यादव म्हणतात, ‘इंडी’ आघाडीचे नेतृत्व ममतांना द्या

दरम्यान, मागील काही वर्षांमध्ये बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम समुदायाकडून दुर्गाडी किल्ला या भागात असलेल्या मशिदीत नमाज अदा केली जाते. अशावेळी खबरदारी म्हणून मंदिर बंद ठेवली जातात. यावरून अनेक वेळा हिंदू संघटनांनी आवाज उठवला. यंदाच्या बकरी ईदवेळी देखील दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी घातली गेली होती.  मंदिराच्या प्रवेशावरून शिवसेना शिंदे, ठाकरे गटाकडून किल्ल्याबाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आले होते.

९० च्या दशकात आनंद दिघेंनी याचा विरोध करत या ठिकाणी घंटानाद आंदोलची सुरुवात केली होती. यावर्षीही या ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले होते. दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक वाढल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येतो. दरम्यान, अनेकदा या भागामध्ये धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या या प्रकरणावर निकाल लागल्याने आता हा वाद शांत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version