कल्याण मारहाण प्रकरण; अखिलेश शुक्लाने मांडली व्हिडिओतून बाजू!

शेजारील देशमुख-कविळकट्टे कुटुंबांवर केला आरोप 

कल्याण मारहाण प्रकरण; अखिलेश शुक्लाने मांडली व्हिडिओतून बाजू!

कल्याण शहरातील योगीधाममध्ये मराठी कुटुंबाला शेजारी आणि गावगुंडांनी मारहाण केल्याची घटना काल घडली होती. या घटनेनंतर राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. याच दरम्यान, अखिलेश शुक्लाचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने घटनेची माहिती सांगत स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये त्यांनी शेजारील देशमुख आणि कविळकट्टे कुटुंबांवर आरोप केला आहे.

अखिलेश शुक्लाने व्हिडीओमध्ये म्हटले, एक वर्षा अगोदर घराचा इंटेरीअर केला आणि माझा शु ‘रॅक’ डाव्या बाजूने उजव्या बाजूला केला. त्याच्यानंतर फ्लॅट क्रमांक ४०४ मध्ये राहणाऱ्या देशमुख कुटुंबाने आणि ४०३ मध्ये राहणाऱ्या कविळकट्टे कुटुंबाने यावरून खूप वादविवाद केला. शु ‘रॅक’ दुसऱ्या बाजूला कशासाठी केला, आहे तिकडेच करा नाहीतर तोडून टाकू असे त्यांनी म्हटले. एक वर्षांपासून दोन्ही कुटुंबाने मला आणि माझी पत्नीला खूप त्रास दिला आणि शिवीगाळ केली. मात्र आम्ही ते सहन केले.

परवा संध्याकाळी माझ्या पत्नीने घराबाहेर धूपबत्ती लावून ठेवली होती. याचवेळी शेजारील कविळकट्टेंनी सांगितले, धूपमुळे त्रास होत आहे, त्यामुळे तुम्ही लावू नका. नाहीतर तुम्हाला आम्ही इथे राहू देणार नाही, असे त्यांनी म्हटले. यामध्ये मी मध्ये पडलो आणि वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान, देशमुख कुटुंबातील धीरज देशमुख आणि त्याचा लहान भाऊ आले आणि माझ्या बायकोला शिवीगाळ केली आणि दरवाज्यावर जोरजोराने आदळा आपट केली. माझ्या पत्नीचे केस ओढून तिला मारहाण केली. मी सोडवण्याचा प्रयत्न करताना मला देखील मारहाण करत शिवीगाळ करण्यात आली. मात्र, हा विषय माझ्या बाजूने दाखवून व्हिडीओ शेअर करण्यात आला.

हे ही वाचा : 

संकटकाळात काय करायचं हे बोट चालकाने सांगितलं नाही!

काठमांडू ते दुबई ‘हाता’चे जाळे उद्ध्वस्त करण्याचा शंखनाद…

४६ वर्षांनंतर उघडण्यात आलेल्या संभलच्या मंदिराचे एएसआयकडून सर्वेक्षण!

सपा खासदार झियाउर रहमान बर्क यांच्या घरावर बुलडोजर, पायऱ्या तोडल्या!

देशमुख कुटुंब आम्हाला एक वर्षांपासून त्रास देत आहे. दोन दिवसांपूर्वी जे घडले त्यावेळी माझ्या मराठी मित्रांनी सहकार्य करत मला वाचवले. महाराष्ट्रामध्ये ही आमची पाचवी पिढी आहे, आम्हाला इथे १०० वर्षे झाली. त्यामुळे परप्रांतीय कोण आहे, अमराठी कोण आहे याची जाणीव आम्हाला कधीच झाली नाही. पण या लोकांनी हा विषय एवढा गाजवला. माझ्या बायकोला शिवीगाळ करताना ते असेही म्हणाले की, ‘तुम्ही परप्रांतीय लोक घाण करत आहात, आता मी तुम्हाला दाखवतो की आम्ही काय आहोत’, असा आरोप अखिलेश शुक्लाने देशमुख कुटुंबीयांवर केला.

माझे ८० ते ९० टक्के मित्र महाराष्ट्रीयन आहेत, मी मराठी महाराष्ट्रीयन आहे. जे केले ते पत्नीला वाचवण्यासाठी केले. मात्र, देशमुख कुटुंबाने परप्रांतीयाच्या नावाने हा विषय वळवला. यामध्ये काही तथ्य नाही. माजी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही या घटनेची सत्यता तपासावी आणि आम्हाला सहकार्य करावे. ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’, असे अखिलेश शुक्ला यांनी म्हटले. दरम्यान, अखिलेश शुक्लाला पोलिसांनी अटक केली आहे.

 

Exit mobile version