काश्मीरमधील गावात जेव्हा पहिल्यांदाच वीज पोहोचते…

काश्मीरमधील गावात जेव्हा पहिल्यांदाच वीज पोहोचते…

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे देशातील प्रत्येक कोपरा प्रकाशमान करण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यासाठी देशाच्या प्रत्येक भागात वीज पोहोचवण्याचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. केंद्राच्या याच महत्त्वाकांक्षी योजने अंतर्गत जम्मू काश्मीर मधील रंबन जिल्ह्यातील कडोला या गावात पहिल्यांदाच वीज पोहोचली आहे.

जम्मू कश्मीर मधील रंबन जिल्ह्यात लंडाधर पर्वतरांगांमध्ये एका टेकडीवर कडोला हे गाव वसले आहे. मुख्य रंबन बस स्टँड पासून अवघ्या बारा किलोमीटरवर असलेल्या या गावात स्वातंत्र्य प्राप्तीपासून आजपर्यंत वीज पोहोचली नव्हती. पण केंद्रातील मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे आता हे गावही वीजेच्या दिव्यांनी उजळून निघाले आहे.

हे ही वाचा:

जनतेसाठी पैसा नाही, पण मंत्र्यांसाठी उभारणार आलिशान टॉवर

‘त्या’ दिव्यांगाच्या कुटुंबाला द्या ५० लाख

वाहतूक पोलिसांचे ई चलान मशीनच चोरले

पुलावामामध्ये लष्करच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

एएनआय या वृत्तसंस्थेने या संबंधीची बातमी दिली आहे. निसार हुसेन या जम्मु पॉवर डिस्ट्रीब्यूशन कॉर्पोरेशन लिमिटेड मधील एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर यांनी दिलेल्या माहितीनुसार कडोला गावातील सर्व २५ घरांना वीज पुरवठा झाला आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजे ७ जुलै रोजी हे सर्व काम पूर्ण झाले. सौभाग्य योजनेच्या अंतर्गत हे सर्व काम पूर्ण झाले असून ट्रान्सफॉर्मर आणि विजेचे खांब बसवण्याचे ही काम पूर्णत्वास गेले आहे.

याप्रसंगी कडोला गावातील रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असून प्रशासनाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. कडोला गावातील मोहम्मद इक्बाल यांनी प्रतिक्रिया देताना असे सांगीतले की, “आम्हाला पहिल्यांदाच वीज मिळत आहे. गावातील २५ घरांना वीज पुरवठा करण्यात आला आहे. या आधी वीजेच्या अभावामुळे आमच्या मुलांचे शिक्षण धड होत नव्हते. आमचे मोबाईल फोन चार्ज करायचे झाले तरी आम्हाला रंबन या मुख्य शहराच्या ठिकाणी जावे लागत असे. पण आता आम्हीही धावत्या जगासोबत राहू शकतो. एक टीव्ही घेण्याचा आमचा विचार आहे.”

Exit mobile version