कबड्डीपटू जया शेट्टींच्या “जयोगाथा”चे प्रकाशन

आज होणार सोहळा

कबड्डीपटू जया शेट्टींच्या “जयोगाथा”चे प्रकाशन

कबड्डीसारख्या लोकप्रिय आणि देशी खेळाचे खेळाडू, संघटक, शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराचे मानकरी जया शेट्टी यांच्या ” जयोगाथा – झपाटलेला समाजसेवी क्रीडापटूची” या आत्मकथेचा प्रकाशन सोहळा रविवारी १४ जानेवारीला सकाळी ११ वाजता बंट्स संघ एनेक्स, कुर्ला, पूर्व येथे पार पडणार आहे.

ज्येष्ठ क्रीडा समीक्षक रणजीत दळवी यांच्या शब्दरूपाने सजलेल्या “जयोगाथा” या कबड्डी ग्रंथाचे प्रकाशन खासदार गोपाळ शेट्टी, माजी ऑलिंपियन एम.एम. सोमय्या, जागतिक बंट्स संघाचे अध्यक्ष आईकला हरीश शेट्टी, बंट्स संघ मुंबईचे अध्यक्ष प्रवीण भोजा शेट्टी, मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव अजिंक्य नाईक, मुंबई क्रिकेट संघटनेचे माजी सचिव डॉ. पी. व्ही. शेट्टी, कबड्डीचे प्रथम अर्जुन पुरस्कार विजेते सदानंद शेटे, ज्येष्ठ क्रीडा संघटक जय कवळी, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर, ज्येष्ठ क्रीडा संघटक श्रीपाद हळबे आणि सह्याद्री क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राहुल वाळंज यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

हे ही वाचा:

मालदीवच्या अध्यक्षांनी तोडले अकलेचे तारे!

प. बंगालमध्ये साधूंना मारहाण करणाऱ्या १२ जणांना अटक

‘आरआरआर’ फेम अभिनेता रामचरण राम मंदिरासाठी सपत्निक आमंत्रित

मॉल्स, दुकानांमध्ये ख्रिसमस ट्रीप्रमाणे राम मंदिराची प्रतिकृती ठेवा

कबड्डीचा इतिहास आणि खडतर प्रवास प्रत्यक्षपणे अनुभवलेल्या जया शेट्टी यांनी या जयोगाथेच्या निमित्ताने तो पुन्हा उलगडला आहे. हे केवळ एक पुस्तक नसून कबड्डीचा ग्रंथ आहे.

नव्या पिढीसाठी या ग्रंथाच्या रूपाने कबड्डीचा इत्यंभूत इतिहास जाणून घेता येणार आहे. या कबड्डी ग्रंथाला ज्येष्ठ राष्ट्रीय नेते शरद पवार यांची प्रस्तावना लाभली आहे.

Exit mobile version