इंग्लंडविरोधातील दुसरा आणि तिसरा कसोटी सामना हुकल्यानंतर भारताचा अष्टपैलू फलंदाज केएल राहुल २३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या रांची कसोटीत परतण्यासाठी सज्ज झाला आहे. तर, इंग्लंडचा गोलंदाज बेन स्टोक्सही त्याच्या गोलंदाजीची कमाल दाखवण्यासाठी उत्सुक आहे.
केएल राहुलला दुखापतीमुळे विशाखापट्टणम आणि राजकोट येथील सामने मुकावे लागले होते. मात्र आता तो दुखापतीतून सावरत असल्याचे भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने रविवारी स्पष्ट केले. राहुलला हैदराबादच्या पहिल्या सामन्यात दुखापत झाली होती. तो राजकोटला खेळेल, अशी शक्यता होती. मात्र तो ९० टक्के तंदुरुस्त होता. त्यामुळे त्याला मैदानाच्या बाहेरच राहावे लागले. राहुल परतल्यास पहिल्या दोन सामन्यांत मोठी धावसंख्या उभारण्यात अयशस्वी ठरलेल्या रजत पाटिदार याला मैदानाबाहेर जावे लागेल.
तर, दुसरीकडे इंग्लंडच्या संघातही आनंदाचे वातावरण आहे. पुढच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी बेन स्टोक्स परतण्याची शक्यता आहे. सन २०२३च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर स्टोक्स याच्यावर गुडघ्याची सर्जरी करण्यात आली होती. स्टोक्सने या मालिकेतील एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे इंग्लंडला चार गोलंदाजांनिशी खेळावे लागत आहे.
हे ही वाचा:
चंदीगडच्या भाजपा महापौरांचा पदाचा राजीनामा; आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
टाटा समूहाचे बाजारमूल्य पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त!
काँग्रेसच्या प्रमोद कृष्णम यांचे आमंत्रण; मोदींनी केली कल्की मंदिराची पायाभरणी!
कमलनाथ भाजपमध्ये जाणार नाहीत, मात्र नकुलनाथ जाण्याची शक्यता!
याबाबत बेन स्टोक्स याला विचारले असता, ‘मी होयदेखील म्हणत नाही आणि नाहीदेखील. मी केवळ इतकेच सांगू इच्छितो की, मला जसे वाटले होते, त्यापेक्षा अधिक वेगाने मी प्रगती करतो आहे. मी नेहमीच सकारात्मकतेने विचार केला आहे. मात्र आमच्या संघाचे वैद्यकीय पथकच मी किती फिट आहे हे सांगून याबाबत अधिक स्पष्टीकरण देऊ शकेल. मी एके दिवशी १०० टक्के गोलंदाजी करू शकलो, याचा मला अत्यानंद आहे. त्यामुळे मी कसोटी सामन्यात खेळेल, असा मला विश्वास वाटला. मात्र ते कदाचित मूर्खपणाचेही ठरू शकते. कारण माझ्या प्रकृतीत अजूनही सुधारणा होत आहे,’ असे स्टोक्स म्हणाला.