दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेल्या बीआरएस नेत्या के. कविता यांचा त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत.अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीनंतर आता सीबीआयनेही कारवाई केली असून के. कविता यांना अटक करण्यात आली आहे.दिल्ली दारू प्रकरणी के कविता यांची सीबीआयने शनिवारी ६ तास चौकशी केली होती. त्यानंतर आज गुरुवारी(११ एप्रिल) तिहार तुरुंगातून के.कविता यांना अटक केली आहे.
वास्तविक, के. कविता ह्या आज तिहार तुरुंगात राहणार असून उद्या म्हणजेच शुक्रवारी(१२ एप्रिल) त्यांना न्यायालयात हजर केले जाईल, जिथे सीबीआय रिमांडची मागणी करणार आहे.के कविता सध्या तिहार तुरुंग क्रमांक ६ मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे आहेत.के. कविता यांना ईडीने १५ मार्च रोजी हैदराबाद येथील राहत्या घरातून अटक केली होती. २६ मार्च रोजी राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने के. कविता यांची तिहार तुरुंगात रवानगी केली होती.
हे ही वाचा:
हार्दिक आणि कुणाल पंड्याच्या सावत्र भावाला अटक!
केमोथेरपीनंतर महिलेचे केस गळले,त्वचा खराब झाली, नंतर कळले कर्करोग झालाच नाही!
“मविआने जागा वाटपाच्या वेळी विश्वासात घेतले नाही”
“नेहरूंमुळे भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य बनता आले नाही”
विशेष न्यायालयाची परवानगी घेतल्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ६ एप्रिल रोजी कविता यांची तुरुंगात चौकशी केली होती.दरम्यान, या प्रकरणी पुढील सुनावणी २६ एप्रिल रोजी होणार आहे.दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांनाही अटक केली आहे.