दिल्ली दारू धोरण प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे.बीआरएस पक्षाचे नेते आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के.सी राव यांची कन्या के कविता याना ईडीने ताब्यात घेतले आहे.ईडीचे पथक के कविता यांना अटक करून हैद्राबादहुन दिल्लीला आणत आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.ईडीने २१ फेब्रुवारी रोजी के कविता यांना समन्स बजावून २६ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.अखेर पथकाने कारवाई करत शुक्रवारी(१५ मार्च) ताब्यात घेतले.
हे ही वाचा..
दिल्लीत रस्त्यावरच्या नमाजाला घातला पायबंद!
अनेक कुलकर्णी मुंबई संघात येतील पण धवल कुलकर्णी सारखे कोणी नाही
ड्रोन हल्ल्यावर तेलंगणा पोलिसांचे ‘गरुड’ ठेवणार तीक्ष्ण नजर!
इलेक्टोरल बाँड्सचे सर्वात मोठे खरेदीदार फ्यूचर गेमिंगचे सँटियागो मार्टिन
मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडीने शुक्रवारी के कविता यांच्या हैद्राबाद येथील घरावर छापा टाकला.यावेळी पथकाकडून बीआरएस नेत्या कविता यांची चौकशी करण्यात आली.चौकशी नंतर के कविता यांना ईडीने ताब्यात घेऊन हैद्राबादहुन दिल्लीला आणण्यात येत असल्याची माहिती आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दावा केला होता की, बीआरएस नेत्या के कविता या मद्य व्यापाऱ्यांच्या लॉबी ‘साउथ ग्रुप’शी जोडलेल्या होत्या, २०२१-२२ च्या दिल्ली उत्पादन शुल्क धोरणात मोठी भूमिका बजावण्याचा त्या प्रयत्न करत होत्या.दरम्यान, हे धोरण आता रद्द करण्यात आले आहे.