के. कविता यांनी १०० कोटी रुपयांची दलाली घेतली

ईडीने लावला आरोप

के. कविता यांनी १०० कोटी रुपयांची दलाली घेतली

भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांनी तथाकथित ‘साउथ ग्रुप’च्या सदस्यांसोबत आणि आप नेत्यांसोबत १०० कोटी रुपयांची दलाली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणाशी निगडीत गैरफायदा मिळवण्याचा कट रचला होता, असा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे.

कें. कविता यांनी कट रचून तसेच इंडो स्पिरिट्सची निर्मिती करून २९२.८ कोटी रुपयांच्या गुन्ह्यातील उत्पन्न, संपादन आणि वापरात भाग घेतला होता, असा दावा तपास संस्थेने केला आहे. इंडो स्पिरिट्सला एक अस्सल व्यवसायिक संस्था म्हणून दाखवून आणि २९२.८ कोटी रुपयांच्या गुन्ह्याचे उत्पन्न मिळवून ती गुन्ह्यातून मिळालेली रक्कम कायदेशीर व्यवसायातून खरा नफा म्हणून प्रक्षेपित करण्यात त्या गुंतल्या असल्याचेही ईडीच्या आरोपपत्रात म्हटले आहे.

हेही वाचा..

दिल्लीच्या पाणीसंकटाला अन्य राज्ये जबाबदार असल्याचा ‘आप’चा दावा खोटा

एग्झिट पोलनंतर आता मतमोजणीवर लक्ष

सशस्त्र बांगलादेशी तस्करांकडून बीएसएफ जवानाचा अपहरणाचा प्रयत्न!

गौतम गंभीरने सोडले मौन. म्हणाला, ‘भारतीय संघाचे प्रशिक्षक व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा सन्मान नाही’
त्यांनी सहकारी अभिषेक बोईनपल्ली याच्या नावावर इंडो स्पिरिट्सकडून ५.५ कोटी रुपयांच्या गुन्ह्याची रक्कमही मिळवली, असा आरोप करण्यात आला आहे. के कविता या सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मध्यस्थामार्फत दलाली देऊन १,१०० कोटी रुपयांच्या गुन्ह्याच्या उत्पन्नात सहभागी झाली आहे, असा दावा केला आहे.

ईडीच्या म्हणण्यानुसार, के. कविता यांनी या प्रकरणातील त्यांची भूमिका आणि सहभाग लपवण्यासाठी पुरावे आणि मोबाइल फोनमधील माहिती काढून टाकली. चौकशी दरम्यान, के. कविता या टाळाटाळ करत होत्या. त्या फॉरमॅट केलेल्या फोनसाठी कोणतेही स्पष्टीकरण देऊ शकली नाही, असा ईडीने दावा केला. ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, या प्रकरणात साक्षीदारांना प्रभावित करण्याच्या कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग होता.

Exit mobile version