तिरंदाजीमध्ये ज्योती वेन्नमला सुवर्ण; अदितीला ब्राँझ

तिरंदाजीमध्ये ज्योती वेन्नमला सुवर्ण; अदितीला ब्राँझ

आशियाई गेम्स २०२३ मध्ये ज्योती वेन्नम हिने शनिवारी तिरंदाजीतील महिलांच्या वैयक्तिक कम्पाऊंड प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. अशा प्रकारे तिने तिसरे सुवर्णपदक पटकावले आहे. तर, याच प्रकारात अदिती स्वामी हिने ब्राँझ पदकाची कमाई केली. त्यामुळे भारताच्या एकूण पदकांची संख्या ९७ झाली असून भारत १०० पदके निश्चित झाली आहेत. स्पर्धा इतिहासात भारत पहिल्यांदाच १०० पदके जिंकणार, हे निश्चित झाले आहे.

आशियाई गेम्सच्या १४व्या दिवसाची सुरुवात भारतासाठी धडाकेबाज ठरली. ज्योतीचे हे तिसरे सुवर्णपदक ठरले. तिने याआधी महिलांच्या कम्पाऊंड आणि मिश्र कम्पाऊंड प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ज्योती आणि कोरियाच्या शेवॉन हिच्यामध्ये कडवी लढत झाली. ज्योतीने पहिल्याच प्रयत्नात सुरुवातीला नऊ गुणांची कमाई करून कोरियाच्या चावॉन सोविरुद्ध अचूक कामगिरी केली. ज्योतीला आधी आठ गुण देण्यात आले होते. मात्र विचाराअंती आणखी एक गुण वाढवण्यात आला. ज्योतीने कोणताही दबाव येऊ न देता सर्व लक्ष्य अचूक गाठत १० गुणांची कमाई केली.

तत्पूर्वी अदितीने महिलांच्या कम्पाऊंड प्रकारात ब्राँझ पदकाची कमाई केली. तिने इंडोनेशियाच्या झिलिझाटी फॅधली हिचा पराभव केला. दोघांमध्ये कडवी लढत झाली. अदितीने प्रतिस्पर्ध्यावर १४६-१४० अशी मात केली. अदिती केवळ १७ वर्षांची आहे.

हे ही वाचा:

राऊत साहेब, आधी लोकांच्यातून निवडून या… मग म्हणा ऐरे गेरे!

विकासाच्या योजनांमुळे राज्यातील नक्षलग्रस्त भागाचा चेहरामोहरा बदलतोय!

उद्धव ठाकरेंची महायुती सरकारच्या सीबीआय चौकशीची मागणी

एक्सप्रेस थांबली नाही, तरूणांनी टाकल्या उड्या एकाचा मृत्यू

ज्योती आणि अदितीच्या या कामगिरीमुळे आशियाई गेम्स २०२३मधील भारतीय तिरंदाजांच्या पदकांची संख्या सातपर्यंत पोहोचली आहे. भारतीय तिरंदाजांना आणखी दोन पदके मिळण्याची आशा आहे. अभिषेक वर्मा आणि प्रवीण देवताळे हे पुरुष कम्पाऊंडच्या अंतिम फेरीत आपले कौशल्य पणाला लावणार असल्यामुळे तमाम भारतीयांचे लक्ष त्यांच्याकडे असेल.

Exit mobile version