कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो शोधताहेत भारत संबंधांमध्ये ‘संधी’

जी७ शिखर परिषदेत दोन्ही प्रमुखांची झाली होती भेट

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो शोधताहेत भारत संबंधांमध्ये ‘संधी’

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी इटलीतील जी७ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर, आर्थिक संबंध आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर नवनियुक्त भारत सरकारशी जोडण्याबाबत कॅनडा इच्छुक असल्याचे नमूद केले आहे.

मंगळवारी कॅनडाच्या प्रसारमाध्यमांशी बोलताना ट्रुडो म्हणाले की, जी७ शिखर परिषदेबद्दल खरोखरच एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला विविध नेत्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळते. भारत आणि आमच्या नागरिकांमध्ये दृढ संबंध आहेत. एक जागतिक समुदाय म्हणून आपल्याला लोकशाहीच्या रूपात काम करण्याची आवश्यकता आहे, यांसह अनेक मुद्द्यांवर आमच्यात एकमत आहे. आता ते (मोदी) निवडणुकीत विजयी झाले आहेत.

हे ही वाचा..

ब्रह्मोस क्षेपणास्त्र अभियंता निशांत अग्रवालच्या लॅपटॉपमधून गोपनीय डेटा मिळविण्यासाठी पाकिस्तानी हेरांकडून तीन ॲप्सचा वापर!

मुख्यमंत्री पिनाराई विजयन, मुलगी वीणा यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात उच्च न्यायालयाची नोटीस!

‘हमारे बारह’ चित्रपटात मुस्लिम समाजाविरुद्ध काहीही नाही!

उष्णतेमुळे ५७७ हज यात्रेकरूंचा मृत्यू; ५१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

मला वाटते की काही मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा करण्याची ही संधी आहे. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा आणि कॅनेडियन नागरिकांची सुरक्षा आणि कायद्याशी संबंधित गंभीर मुद्द्यांचा समावेश आहे. आम्ही या मुद्द्यांवर चर्चा करू,’ असे ट्रुडो म्हणाले.पंतप्रधान मोदी आणि जस्टिन ट्रूडो यांनी इटलीतील अपुलिया येथे जी ७ शिखर परिषदेच्या बाजूला थोडक्यात संवाद साधला. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये शीख दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंट्सचा “संभाव्य” सहभाग असल्याचा आरोप ट्रूडो यांनी केल्यानंतर ही त्यांची पहिली प्रत्यक्ष बैठक होती. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर दोन्ही नेत्यांचे हस्तांदोलन करतानाचे छायाचित्र पोस्ट केले.

ब्रिटीश कोलंबियातील सरे येथील निज्जर यांच्या हत्येच्या कॅनडाच्या तपासात भारताकडून मिळणाऱ्या सहकार्यात सुधारणा झाल्याबाबत त्यांना विचारले असता, त्यांनी याबाबत प्रक्रिया सुरू असल्याचे उत्तर ट्रूडो यांनी दिले. भारताने गेल्या वर्षीपासून ट्रुडो यांच्या आरोपांना निरर्थक संबोधून ते फेटाळून लावले आहेत. तर, कॅनडा आपल्या भूमीत मुक्तपणे कार्यरत असलेल्या खलिस्तान समर्थक घटकांना थारा देत असल्याचा आरोप भारत सरकारने केला आहे.

Exit mobile version