फुफ्फुसात संसर्ग झाल्याने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मोहन एम. शांतनगौदर यांचा मृत्यू झाला आहे. वयाच्या ६२व्या वर्षी शांदनगौदर यांनी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांना कोरोना झाला होता की नाही, हे अद्याप कन्फर्म झालेलं नाही.
शांतनगौदर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्रीपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र, रात्री उशिरा अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांचं निधन झालं. त्याच्या निधनावर वकील आणि न्यायाधीशांनी शोक व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
कठीण समय येता रशिया कामास येतो?
रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्याला अटक
धर्मांतरासाठी ५०,००० रुपयांची लालूच, नकार दिल्यावर मारहाण
केंद्राने निधी दिला, तरीही ठाकरे सरकारने उभारले नाहीत ऑक्सिजन प्लॅन्ट्स
१७ फेब्रुवारी २०१७ मध्ये शांतनगौदर यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी पदोन्नती मिळाली होती. शांतनगौदर यांचा जन्म ५ मे १९५८ रोजी कर्नाटकात झाला होता. १९८० मध्ये एक वकील म्हणून त्यांनी स्वत:ला सिद्ध केलं होतं. त्यांची नामांकित वकिलांमध्ये गणती होऊ लागली. त्यानंतर २००३ मध्ये कर्नाटक हायकोर्टात ऍडिशनल जज म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सप्टेंबर २००४ मध्ये त्यांना परमनंट जज म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्यानंतर त्यांची केरळ उच्च न्यायालयात बदली झाली. १ ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांनी कार्यवाहक चीफ जस्टिस म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर २२ सप्टेंबर २०१६ मध्ये ते केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले. २०१७ मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली होती. देशात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.