न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी आज, ९ नोव्हेंबर रोजी देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली आहे. या शपथ सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत दोन वर्षांसाठी सरन्यायाधीश पदावर असणार आहेत. देशाचे ४९ वे सरन्यायाधीश उदय लळीत यांची ते जागा घेतील. उदय लळीत यांनी ११ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांची उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली होती. त्यानुसार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चंद्रचूड यांना शपथ दिली आहे. १९७८ ते १९८५ या काळात ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.
हे ही वाचा:
‘खोक्या’बद्दल लवकरच सुप्रिया सुळेंना नोटीस देण्याची तयारी
दिल्ली, उत्तर भारतासह नेपाळमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के
भारत जोडो यात्रेत शरद पवारांऐवजी ; दुसरे नेते होणार सामील
कुनोच्या राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांनी केली ‘पहिली’ शिकार
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला आहे. त्यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी सुमारे सात वर्षे आणि चार महिने मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले आहे. तेसुद्धा सरन्यायाधीशपदी होते. न्यायमूर्ती धनंजय यांना जून ११९८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले होते आणि त्याच वर्षी महाधिवक्ता म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. २०१६ साली त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली. ऐतिहासिक निकाल देणार्या अनेक घटनापीठांचा तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांचा ते भाग राहिले आहेत.