‘मी भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषणसिंह यांचा निकटवर्यीय असलो तरी मी डमी उमेदवार नाही. मी १२ वर्षे कुस्ती महासंघात आहे. मी त्यांचा निकटवर्तीय आहे, हा माझा गुन्हा आहे का?,’ असा प्रश्न भारतीय कुस्ती महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्षसंजय सिंह यांनी विचारला आहे.
कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी कुस्ती महासंघाच्या या निवडणुकीनंतर कुस्तीला राम राम करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तिच्या अश्रूंचा बांध फुटला होता. बृजभूषण सिंह यांच्याच निकटवर्तीयांकडून ही संघटना चालवली जाणार असल्याबाबत साक्षी मलिक हिने टीका केली होती. संजय सिंह यांनी या वक्तव्याचाही समाचार घेतला. ‘कुस्तीपटूंनी याआधीच तयारीला सुरुवात केली आहे. ज्यांना राजकारण करायचे आहे, ते तेच करणे सुरू ठेवतील,’ अशी टीका त्यांनी केली.
हे ही वाचा:
‘खासदारांचा जाणुनबुजून गोंधळ’; निलंबनाबाबत राज्यसभाध्यक्ष खर्गे यांच्याशी चर्चा करणार!
इस्राइली व्यापारी जहाजावर अरबी समुद्रात ड्रोन हल्ला
न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिका स्वीकारून राज्यातील जनभावनेचा आदर राखला
सावरकरांवरील कार्यक्रमाला पाठवले म्हणून प्राचार्यांवर शिस्तभंगाची कारवाई
‘जे खेळाडू आहेत, त्यांनी याआधीच तयारीला सुरुवात केली आहे आणि ज्यांना राजकारणच करायचे आहे, ते तेच करतील. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी केवळ खासदार बृजभूषण सिंह यांचा निकटवर्तीय आहे, याचा अर्थ मी काही डमी उमेदवार नाही. त्यांचा निकटवर्तीय असणे हा काही गुन्हा आहे का?,’ असा सवाल त्यांनी केला.
अल्पवयीन कुस्तीपटूंसह देशभरातील महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपांवरून उत्तर प्रदेशच्या कैसरगंज मतदारसंघातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांना कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते. मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांच्याच निकटवर्तीयांची निवड झाल्याने साक्षी मलिक हिने आता यापुढे आपण कुस्ती खेळणार नसल्याचे जाहीर केले होते.