अभिनेते ज्युनिअर मेहमूद यांची कॅन्सरशी सुरू असणारी झुंज अखेर अपयशी ठरली. वयाच्या ६७व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांना चौथ्या स्टेजचा कॅन्सर होता.
ज्युनिअर मेहमूद यांनी राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. त्यांना कॅन्सर झाल्याचे वृत्त समजल्यानंतर अनेकांनी त्यांची भेट घेतली होती. जॉनी लिव्हरशी भेट घेतल्यानंतर ज्युनिअर मेहमूद यांनी जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर दोन्ही अभिनेत्यांनी त्यांची भेट घेतली होती.
ज्युनिअर मेहमूद यांनी आपल्या चित्रपटांच्या कारकिर्दीत सुमारे २०० चित्रपटांमध्ये कामे केली होती. त्यांनी केवळ हिंदीच नव्हे तर अन्य भाषिक चित्रपटांमध्येही कामे केली होती. ज्युनिअर मेहमूद यांना १९६८मध्ये आलेला ‘ब्रह्मचारी’, १९७०मध्ये आलेला ‘मेरा नाम जोकर’, १९७७मध्ये आलेला ‘परवरिश’ आणि १९८०मध्ये आलेल्या ‘दो और दो पाच’ चित्रपटांसाठी ओळखले जाते.
हे ही वाचा:
केसीआर यांना धोबीपछाड देणाऱ्या काँग्रेसच्या रेवंथ रेड्डींनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
राज्यातील १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करण्याबाबत आराखडा सादर करा
काय होती त्यांची अखेरची इच्छा
ज्युनिअर मेहमूद यांनी त्यांच्या शेवटच्या व्हिडीओमध्ये स्वतःची अखेरची इच्छा जाहीर केली होती. रुग्णालयातून घरी जाताना एका टीव्ही चॅनलशी ते बोलले होते. ‘मी साधा सरळ ज्युनिअर माणूस आहे. हे तुम्ही ओळखलेच असेल. बस. केवळ मी मरेन तेव्हा जग बोलूदे की तो एक चांगला माणूस होता. चार लोक हे बोलले तर समजायचे की तुम्ही जिंकलात,’ असे वक्तव्य त्यांनी केले होते.