26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषका झाली न्यायनिवाडा करणाऱ्यांचीच अवस्था दयनीय?

का झाली न्यायनिवाडा करणाऱ्यांचीच अवस्था दयनीय?

Google News Follow

Related

महाराष्ट्रात कनिष्ठ न्यायाधीशांना देण्यात आलेली अधिकृत निवासस्थाने दयनीय स्थितीत असल्याचा आरोप ‘महाराष्ट्र जजेस असोसिएशन’ने याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केला आहे. माझगाव येथील न्यायाधीशांच्या ‘गुलमोहर’ इमारतीतील काही घरांच्या गच्च्यांचे भाग गेल्या वर्षी पावसाळ्यात कोसळले होते. या दुर्घटनेमुळे करोनाच्या काळातही न्यायाधीशांच्या कुटुंबीयांना अन्य ठिकाणी हलवण्यात आले. ही इमारत ३० वर्षे जुनी असून मोडकळीस आलेल्या स्थितीत आहे. न्यायनिवाडा करणारेच न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत असेच म्हणायला हवे.

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर नुकतीच या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी अधिकृत निवासस्थानाच्या संदर्भात मुंबई आणि राज्यातील उर्वरित न्यायालयीन अधिकाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी असोसिएशनच्या वतीने अ‍ॅड्. तेजस दंडे यांनी न्यायालयासमोर मांडल्या.

हे ही वाचा:
नार्कोटिक्स अधिकाऱ्यांवरच त्याने केला हल्ला आणि…

लाख लाख ‘सोनेरी’ तेजाची सारी दुनिया

४०० लोक उतरले रस्त्यावर आणि केली कमाल

आयसीएमआर म्हणते कोरोनावर हे मिश्रण उपयुक्त

याचिका करण्यापूर्वी असोसिएशनने या निवासस्थानांची पाहणी केली व न्यायालयीन अधिकाऱ्यांकडून निवासस्थानांबाबतच्या समस्या जाणून घेतल्याचेही सांगण्यात आले. तसेच यासंदर्भातील तक्रारींसाठी न्यायाधीशांना ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याबाबतचे मुख्य न्यायमूर्तींकडे निवेदन करण्याची सूचना खंडपीठाने असोसिएशनला केली.

एकूणच घरांची अवस्थाही अतिशय बिकट असल्याचे आता स्पष्ट झालेले आहे. पुण्यातील न्यायाधीशांनी या पाहणीच्या वेळी सांगितले की, त्यांच्या शौचालयाचे छत गळत आहे. वारंवार तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दुरुस्ती केलेली नाही. परिणामी शौचालयात जाताना छत्री घेऊन जावी लागते. यावरून या इमारतींच्या बांधकामाचा दर्जा दिसून येतो. इमारतीतील बहुतांश न्यायाधीशांनी घराची गच्ची धोकादायक असल्याच्या तक्रारी केल्या. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याला काहीच प्रतिसाद देण्यात आला नाही, असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा