27 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरविशेषजेपी नड्डा यांच्या पत्नीची कार बनारसमधून जप्त!

जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार बनारसमधून जप्त!

१९ मार्च रोजी गेली होती चोरीला

Google News Follow

Related

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (जेपी नड्डा) यांच्या पत्नी मल्लिका नड्डा यांची फॉर्च्युनर कार वाराणसी येथून पोलिसांनी जप्त केली आहे. गेल्या महिन्याच्या १९ तारखेला ही कार दक्षिण पूर्व दिल्लीतील गोविंदपुरी परिसरातून चोरीला गेली होती.

कारचा ड्रायव्हर जोगिंदर कारची सर्व्हिसिंग करून रात्री जेवण करण्यासाठी गोविंदपुरी येथील घरी आला होता. त्यानंतर ही कार चोरीला गेली होती. कार चालक जोगिंदरच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारचा शोध सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता कार गुरुग्रामच्या दिशेने जाताना दिसली. या फॉर्च्युनर वाहनाचा क्रमांक हिमाचल प्रदेशातील आहे. वास्तविक जेपी नड्डा हे मूळचे हिमाचल प्रदेशचे असून तेथूनच वाहन नोंदणीकृत आहे.

हे ही वाचा.. 

तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्टॅलिन यांनी दिली दोन मिनिटांची मुलाखत!

सीएए रद्द करणे, कलम ३७० पुन्हा लागू करणार, एफडीआयवर निर्बंध, खासगी क्षेत्रात आरक्षण!

हनुमान चालिसा वाजवणाऱ्या दुकानदाराला मारहाण;कर्नाटक पोलिसांकडून दुकानदारावरच गुन्हा!

जोस बटलरच्या १०० धावा विराटच्या ११३ धावांपेक्षा सरस!

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून दोघांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान पोलिसांना कळले की, जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरण्यासाठी क्रेटा कारमधून बदमाश आले होते. चौकशीत चोरट्यांनी सांगितले की, फॉर्च्युनर कारची मागणी असल्यामुळे चोरली.ही कार नागालँडला नेण्यात येणार होती, मात्र वाराणसीमध्ये हे बदमाश पकडले गेले.

पोलिसांनी याप्रकरणी बडकल येथील रहिवासी शाहिद आणि शिवांग त्रिपाठी यांना अटक केली आहे. चोरटयांनी
बडकल येथे नेल्यानंतर गाडीची नंबर प्लेट बदलली. नंतर अलिगढ, लखीमपूर खेरी, बरेली, सीतापूर, लखनौमार्गे बनारसला पोहोचले.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा