माझगाव डॉकच्या माध्यमातून तिसऱ्या युद्धनौकेच्या लॉंचिंग प्रकल्पाला येत्या ११ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. प्रोजेक्ट १७ अ अंतर्गत तारागिरी प्रकल्पाच्या लॉंचिंगच्या कामाला लवकरच सुरूवात होणे अपेक्षित आहे. तारागिरी प्रकल्पातील पोलादी कण्याचे (कील) चे काम हे १० सप्टेंबर २०२० मध्ये सुरू करण्यात आले होते. तर येत्या ऑगस्ट २०२५ मध्ये ही युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करणे अपेक्षित आहे. याआधीच माझगाव डॉक लिमिटेडने उदयगिरी आणि सूरत या युद्धनौकांचे लॉंचिंग नुकतेच केले होते. ‘मेक इन इंडिया’ धोरणामुळे स्वदेशीकरणाच्या प्रयत्नांना नवीन जोर मिळाला आहे.
आयएनएस तारागिरी फ्रिगेट जहाज सुमारे १५० मीटर लांब आणि १८ मीटर रुंद आहे तसेच दोन गॅस टर्बाइन आणि दोन डिझेल इंजिनच्या साहाय्याने चालते. तारागिरी ६६७० टन वजनाची असून, २८ नॉटिकलचा वेग गाठू शकते. तारागिरी युद्धनौका पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी सुपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणाली बसवली जाईल ज्यामुळे ते शत्रूच्या युद्धनौकांवर मारक ठरेल. तसेच या युद्धानौकामध्ये कुठल्याही राडारमध्ये येऊ न शकणारी प्रणाली बसवण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
अमरावतीचे शिवसेना जिल्हाप्रमुख भाजपाच्या वाटेवर
सर्वांनी सीट बेल्ट बांधा नाहीतर समजा झालाच वांधा
कर्मचाऱ्याने स्वतःच्याच कार्यालयात घातला दरोडा; अशी पकडली गेली चोरी
तिने आपल्या लहानग्याला वाघाच्या जबड्यातून खेचून आणले
संपूर्ण तारागिरीचे काम हे इंटिग्रेटेड कंस्ट्रक्शन मेथडॉलॉजीने करण्यात येत आहे. त्यामध्ये ब्लॉकची निर्मिती विविध ठिकाणी करूनच माझगाव डॉक लिमिटेड येथे हे सुटे भाग जोडण्यात येणार आहेत. जवळपास ३५१० टनची युद्धनौका नौदलाला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. ब्युरो ऑफ नेव्हल डिझाईनच्या माध्यमातून या युद्धनौकेचे डिझाईन करण्यात आले आहे. रविवारच्या जलावतारणानंतर नौदलात दाखल होताना ही युद्धानौका बराक, ब्रह्मोस अशा क्षेपणास्त्रासह पाणबुडीविरोधी यंत्रणादेखील सज्ज होईल.