एसटीमध्ये विविध गटांना आरक्षण असते. पत्रकारांनाही असे आरक्षण असते. त्यांच्यासाठी काही आसने राखीव असतात. मात्र आता नव्याने काही गाड्या मागविल्या असून त्यात मात्र पत्रकारांना अगदी मागील आसने राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे पत्रकारांची चांगलीच गोची होईल.
एसटी बसमध्ये स्वातंत्र्य सैनिक, आमदारांप्रमाणेच पत्रकारांसाठी दोन सीट राखीव ठेवल्या जातात. महिलांनाही वेगळी आसने राखीव असतात तसेच आता महिलांसाठी ५० टक्के तिकिटांत सूटही देण्यात आली आहे. पत्रकारांसाठी असलेल्या या जागा आतापर्यंत आमदाराच्या राखीव सीटच्या मागील सीटवर असायच्या. मात्र आता महामंडळाने सुमारे २७०० नव्या गाडयांच्या बांधणीचे काम हाती घेतले असून त्यामध्ये पत्रकारांसाठीची सीट शेवटून दुसऱ्या रांगेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एसटीच्या लेखी पत्रकार बॅकबेंचर आहे का हे अधोरेखित होत आहे. एकूणच पत्रकारांना या मागच्या आसनांमुळे उडत उडत आदळत जावे लागणार की काय, असा सवाल विचारला जात आहे.
हे ही वाचा:
बिग बँग थिअरीमध्ये माधुरी दीक्षितबद्दल आक्षेपार्ह भाषा, रागावलेल्या चाहत्याने उचलले हे पाऊल
मंत्रालयासमोर करण्यात आलेल्या विषप्राशनाचे वास्तव आले समोर
आकांक्षा, नव जवान, ओम ज्ञानदीप, दादोजी कोंडदेव संघांची दुसऱ्या फेरीत धडक
ऍड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांसाठी रद्द
सर्वसामान्यांची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या एसटीला सात सहा दशकांहून अधिक काळाचा इतिहास आहे. शहरापासून गाव खेडय़ापर्यंत धावणाऱया एसटी बसमध्ये स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, पत्रकार, महिला, दिव्यांग, एसटी कर्मचारी अशा विविध घटकांसाठी गाडीत राखीव सीट असते. आतापर्यंत एसटीमध्ये पत्रकारांसाठी राखीव सीट ११ आणि १२ व्या क्रमांकावर ठेवली जात होती. मात्र महामंडळाने नव्या ४२ सीटच्या गाडय़ांमध्ये पत्रकारांनी गाडीतील शेवटून दुसऱया रांगेत म्हणजे ३० नंबरची सीट राखीव ठेवली आहे. यावरून आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.