पत्रकार विनोद दुआ यांचे शनिवारी प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर ते आजारी होते. त्यांची मुलगी मल्लिका दुआ हिने सोशल मीडियावरून वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त दिले.
दुआ हे ६७ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात त्यांना अपोलो रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आणण्यात आले होते. त्यांच्यावर आता लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हिंदी पत्रकारितेत त्यांनी स्वतःचा ठसा उमटविताना दूरदर्शन आणि एनडीटीव्हीत पत्रकारिता केली. नंतर ते वेबपोर्टलवर पत्रकार म्हणून काम करत होते.
त्यांची पत्नी पद्मावती दुआ यांच्यासोबत त्यांना गुरुग्राम येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. कोरोनाच्या बाधेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण जून महिन्यात दुआ यांच्या पत्नी मृत्युमुखी पडल्या त्यानंतर दुआ यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात मल्लिका दुआ आणि बकुल दुआ या दोन मुली आहेत.
हे ही वाचा:
कर्नाटकनंतर गुजरातमध्ये ओमिक्रोनची एंट्री
AK-203 रायफल्स बनवणाऱ्या प्रकल्पाला केंद्राची मंजुरी
कोस्टल रोडच्या कामातही बीएमसीचा भ्रष्टाचार?
‘सामना आणि संपादकांचा केंद्रबिंदू बदलला आहे’
दुआ यांचा ‘जायका इंडिया का’ हा कार्यक्रम लोकप्रिय होता. वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांनी केलेली टिप्पणी आणि नंतर राजीव गांधी यांच्यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरील त्यांची टिप्पणी यातून त्यांची दुटप्पी भूमिका दिसून आली होती. त्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. ‘मी टू’ या चळवळीदरम्यान निष्ठा जैन या महिलेने दुआ यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते.