मुंबई हिंदी पत्रकार संघाचे सरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार विजय सिंह कौशिक यांना पितृशोक झाला आहे. विजय सिंह कौशिक यांचे वडील प्रसिद्ध नारायण सिंह यांचे रविवार, १८ सप्टेंबर रोजी सकाळी सांताक्रूझ पूर्व येथील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात चार मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
प्रसिद्ध नारायण सिंह हे मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील अधनपूर-जमालपूर गावचे रहिवासी होते. मुंबईतील मोदी स्टोन टायर कंपनीत ते कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारीच त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. मात्र, काल सकाळी १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रसिद्ध नारायण सिंह यांचा तृतीय पुत्र अजय सिंह हे भाजपा मुंबईचे प्रवक्ते आहेत. त्यांच्या पार्थिवावर वांद्रे पूर्व, टीचर्स कॉलनी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचा धाकटा मुलगा विजय सिंह यांनी त्यांना मुखाग्नी दिला.
हे ही वाचा:
टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळाडू घालणार ‘हर फॅन की जर्सी’
हॉस्टेलमधील ‘त्या’ मुलींचे व्हिडीओ काढणाऱ्या मुलीला शिक्षिकेने विचारला जाब
राज ठाकरेंनी विदर्भात निवडणूक तयारीचे दिले आदेश
प्रसिद्ध नारायण सिंह यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष संतोष आर. एन. सिंह, माजी मंत्री नसीम खान, कृपाशंकर सिंह, भाजपा आमदार राजहन सिंह, पराग अल्वानी, मुंबई भाजपा उपाध्यक्ष अमरजित सिंह, आचार्य पवन त्रिपाठी, जयप्रकाश सिंह, माजी आमदार अभिराम सिंह, काशी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. सुभाष सिंह, रत्नेश सिंह, उदय प्रताप सिंह, विजय सिंह, अखिलेश सिंह, मनोज नाथानी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, नातेवाईक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.