देशातील आघाडीची वृत्तवाहिनी एनडीटीव्हीचा मुख्य चेहरा असलेले पत्रकार रवीश कुमार यांनी बुधवारी संध्याकाळी एनडीटीव्हीचा राजीनामा दिला. एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे संस्थापक आणि प्रवर्तक प्रणय रॉय आणि प्रवर्तक राधिका रॉय यांच्या राजीनाम्यानंतर रवीश कुमार यांनी हा राजीनामा दिला आहे. मंगळवारी, एनडीटीव्हीचे प्रवर्तक राधिका रॉय आणि प्रणय रॉय यांनी आरआरपीआरएच ग्रुपच्या संचालकपदाचा राजीनामा दिला.
रवीश कुमार यांनी चॅनलमधील अंतर्गत मेलद्वारे राजीनामा सादर केला जो ताबडतोब स्वीकारला गेला. एनडीटीव्ही समूहाच्या अध्यक्षा सुपर्णा सिंह यांनी ही माहिती दिली. एनडीटीव्ही (हिंदी) च्या सर्वात लोकप्रिय चेहऱ्यांमध्ये रवीश कुमारची यांची गणना केली जाते. रविश कुमार यांना पत्रकारितेतील त्यांच्या योगदानाबद्दल २०१९ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय त्यांना दोन वेळा रामनाथ गोएंका एक्सलन्स अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले होते. हिंदी पत्रकारितेतील पत्रकार रवीश कुमार यांनी त्यांच्या कार्यकाळात हम लोग, रविश की रिपोर्ट, देश की बात आणि प्राइम टाइमसह अनेक कार्यक्रम आयोजित केले होते.
हे ही वाचा :
ISIS चा म्होरक्या युद्धात ठार, नव्या म्होरक्याचं नाव घोषित
अफगाणिस्तानात स्फोटांची मालिका सुरूच; मदरशातील स्फोटाने घेतले १८ बळी
दिलासा नाहीच; नवाब मलिक यांचा तुरुंगातच मुक्काम
पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबरला येणार नागपुरात
गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपने एनडीटीव्ही मध्ये २९.१८ टक्के हिस्सा विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. एवढा मोठा वाटा असल्याने आता ही वाहिनी अदानींच्या ताब्यात येणार अशी चर्चा रंगली आहे. तसेच गौतम अदानी यांच्या कंपनीने २६ टक्के अतिरिक्त स्टेक खरेदी करण्याची खुली ऑफरही दिली असून छोटे गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स विकू शकतात. अदानी यांच्या या प्रस्तावानंतर रवीश कुमार यांनी राजीनामा दिला असल्याचे म्हटले जातं आहे.