दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांना राष्ट्रवादीकडून ती मदत अद्याप नाही, पत्नीने केली विनंती

५ लाखांची मदत देण्याचे दिले होते आश्वासन

दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांना राष्ट्रवादीकडून ती मदत अद्याप नाही, पत्नीने केली विनंती

दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले पत्रकार पांडुरंग रायकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली होती पण अद्याप दोन वर्षे उलटली तरी ही मदत मिळालेली नाही. पांडुरंग रायकर यांच्या पत्नी शीतल रायकर यांनी तसे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना लिहिले आहे.

या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मी अर्जदार शीतल पांडुरंग रायकर, राहणार कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. कोरोनाच्या काळात पहिल्या लाटेमध्ये माझे पती पांडुरंग रायकर जे टीव्ही ९ वाहिनीसाठी वार्तांकन करत असत. कोरोनासंदर्भात कर्तव्य बजावत अशताना त्यांना कोविड १९ ची लागण होऊन त्यांचे २ सप्टेंबर २०२०ला निधन झाले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबाचे सांत्वन करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ५ लाखांची मदत माझी मुले आयांश पांडुरंग रायकर (वय ६) आणि पृथ्वीजा पांडुरंग रायकर (वय ३) यांना जाहीर केली होती, पण आज ५ नोव्हेंबर २०२२ या तारखेलाही ती मदत मुलांपर्यंत पोहोचलेली नाही. आपल्या कार्यव्यस्ततेमुळे मदत राहून गेली असेल तरी जाहीर केलेली मदत कृपया मिळावी ही विनंती.

हे ही वाचा:

उत्तराखंड भूकंपाने हादरले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा जाणार गुवाहटीला

लवकरच भारतात होणार ‘ट्विटर ब्लू टिक’ लाँच, मस्क यांची पुष्टी

झिम्बाब्वेच्या सामन्याआधीच भारत उपांत्य फेरीत, पाकिस्तानचाही प्रवेश, दक्षिण आफ्रिका बाद

शीतल रायकर यांनी आपल्या मुलांचे बँक अकाऊंट नंबरही त्यात दिले आहेत. या पत्राची प्रत त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही पाठविली आहे.

यासंदर्भात केंद्र सरकारने रायकर कुटुंबाला ५ लाखांची मदत दिली होती, मात्र तत्कालिन राज्य सरकारकडून कोणतीही मदत देण्यात आली नव्हती. २०२१ला वर्ष झाले तरी ती मदत मिळाली नव्हती. त्यासंदर्भातही शीतल रायकर यांनी तक्रार केली होती.

Exit mobile version