अर्णब गोस्वामीप्रमाणे बंगालमध्येही पत्रकाराची मुस्कटदाबी?

ममता बॅनर्जी यांच्याकडून दबाव आल्यामुळे पत्रकार मजुमदार यांचा फोन बंद झाल्याचा आरोप

अर्णब गोस्वामीप्रमाणे बंगालमध्येही पत्रकाराची मुस्कटदाबी?

पश्चिम बंगालमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि नंतर तिची झालेली हत्या यामुळे समाज ढवळून निघालेला असताना ममता बॅनर्जी सरकारने मात्र संवेदनशून्यतेचे दर्शन घडविले आहे. आता तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच त्या गदा आणत असल्याचे आरोप होऊ लागले आहेत.

ज्येष्ठ पत्रकार अभिजित मजुमदार यांनी हा आरोप ममता सरकारवर केला आहे. ममता सरकारच्या सांगण्यावरून आपला एअरटेलचा मोबाईल नंबर बंद करण्यात आल्याचा आरोप मजुमदार यांनी केला आहे. सरकारने आता बेकायदा आणि हुकुमशाही पद्धतीची पावले उचलण्यास सुरुवात केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ऑप इंडियाने हे वृत्त दिले आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातही सुशांतसिंग आणि दिशा सालियन प्रकरणानंतर अर्णब गोस्वामी यांनी रिपब्लिक वाहिनीवर महाविकास आघाडी सरकारविरोधात मोहीम उघडली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यांना तुरुंगवास सहन करावा लागला होता.

३० ऑगस्टला इअरशॉटचे मुख्य संपादक व संस्थापक अभिजित मजुमदार यांनी आरोप केला होता की, बंगालच्या सायबर पोलिसांच्या आदेशावरून आपला एअरटेलचा नंबर ब्लॉक करण्यात आला. एक्सवर त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, माझा फोन ब्लॉक झाला आहे. मी त्यासाठी एअरटेलला फोन केला तर त्यांनी सांगितले की, पश्चिम बंगालच्या सायबर पोलिसांकडून तो ब्लॉक करण्यास सांगण्यात आले आहे. हे कायदेशीर आहे का?

हे ही वाचा:

बांगलादेश: हिंदू शिक्षकांकडून जबरदस्तीने घेतले जात आहेत राजीनामे !

पतंजलीच्या ‘दिव्य मंजन’मध्ये माशांचा अर्क असल्याचा दावा

टायगर मेमनच्या तीन सदनिका केंद्र सरकारच्या ताब्यात

तबेला मालकाच्या खिशात ड्रग्सचे पाकीट टाकताना पोलीस सापडले

आणखी एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, गैरकृत्यांमध्ये सहभागी असल्याबद्दल आपला नंबर ब्लॉक करण्यात आल्याचे कारण देण्यात आले आहे. माझ्यावर जे आरोप ठेवण्यात आले आहेत, त्याचे पुरावे संबंधितांनी द्यावेत. मी कोलकात्यात झालेल्या बलात्कार प्रकरणात बोलल्यामुळे माझा नंबर ब्लॉक करण्यात आला आहे का? माझे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे का?

फोन नंबर ब्लॉक केल्यामुळे मजुमदार यांना कुणालाही फोन करता येत नाही. एअरटेलच्या कॉल सेंटरवर मजुमदार यांनी फोन केला आणि माहिती घेतली तेव्हा तो एजन्ट म्हणाला की, गैरकृत्यामुळे तुमचा फोन बंद करण्यात आला आहे. मग अशी कारवाई देशभरात का केली जात नाही, असा सवाल विचारल्यावर तो एजन्ट म्हणाला की, पोलिसांनी ही कारवाई या राज्यापुरतीच केलेली आहे.कोणतीही चौकशी न करता ही कारवाई का करण्यात आली, या प्रश्नाचे उत्तर मात्र तो एजन्ट देऊ शकला नाही.

आपण यासंदर्भात सोमवारी न्यायालयात दाद मागणार आहोत, असेही मजुमदार यांनी म्हटले आहे.

Exit mobile version