अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधींच्या सहकाऱ्यांकडून पत्रकारावर हल्ला !

वॉशिंग्टन डीसीमध्ये राहणाऱ्या पुरस्कार विजेता पत्रकार रोहित शर्माने सांगितला अनुभव

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधींच्या सहकाऱ्यांकडून पत्रकारावर हल्ला !

काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी चार दिवसीय युएस दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी परदेशात जाऊन भारताविरुद्ध वक्तव्य करताना दिसत आहेत. याच दरम्यान राहुल गांधींच्या मुलाखतीपूर्वी त्यांच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचा अनुभव एका पत्रकारने सांगितला आहे. ‘राहुल गांधी अमेरिकन खासदारांसोबतच्या बैठकीमध्ये बांगलादेशात हिंदूंच्या हत्या झाल्याचा मुद्दा उपस्थित करतील का?’, या प्रश्नावर संतप्त झालेल्या राहुल गांधींच्या सहकाऱ्यांनी मोबाईल हिसकावून, चार दिवस मोबाईल जप्त केल्याचे पत्रकारने संगितले आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये राहणारे पत्रकार रोहित शर्माने यांनी हा अनुभव सांगितला आहे. हे सर्व इंडियन ओव्हरसीज काँग्रेस (IOC) चे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्यासमोर झाल्याचे पत्रकाराने सांगितले.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, पत्रकार रोहित शर्मा म्हणाले,  शनिवारी, ७ सप्टेंबर रोजी, मी भारतीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बहुप्रतिक्षित भेटीचे कव्हर करण्यासाठी डॅलस, टेक्सास येथे गेलो होतो. या ठिकाणी राहुल गांधी येणार होते, त्यामुळे त्यांची भेट घेवून विविध विषयांवर प्रश्न विचारायचे होते. राहुल गांधींच्या भेटीपूर्वी इंडियन ओव्हरसीज काँग्रेस (IOC) चे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचाशी संपर्क साधला, या अगोदरही सॅम पित्रोदा यांची मुलाखत घेतली होती. त्यामुळे राहुल गांधी यांची मुलाखत होईल याची खात्री होती.

ते पुढे म्हणाले, ठरल्याप्रमाणे टेक्सास येथील रिट्झ कार्लटन येथे संध्याकाळी ७.३० वाजता पोहोचलो. अनेक आयओसी सदस्यांना भेटल्यानंतर, मला सॅम यांच्या व्हिलाकडे जाण्यास सांगितले. त्या त्याठिकाणी सुमारे ३० जण होते, त्यापैकी काही भारतातून आले होते, तर काही आयओसी यूएसए मधून आले होते. हे सर्व राहुल गांधींच्या आगमनाची ते आतुरतेने वाट पाहत होते.

या गोंधळात सॅमने मला लगेच ओळखले आणि गर्दीला मुलाखतीसाठी शांत होण्यास सांगितले. त्यानंतर मुलाखतीला सुरवात केली, मी माझा फोनही रेकॉर्ड करण्यासाठी सेट केला. सॅम पित्रोदा यांनी सुरवातीच्या माझ्या चार प्रश्नांची सहज उत्तरे दिली, पण नंतर, माझ्या अंतिम प्रश्नाने सर्व काही बदलले.

हे ही वाचा :

हरियाणा विधानसभा प्रचाराचे नेतृत्व पंतप्रधान मोदी, गडकरींसह ४० नेत्यांच्या हाती !

बिहारमध्ये बलात्कार करू पाहणाऱ्या डॉक्टरच्या गुप्तांगावर नर्सने केले वार !

मोहम्मद झाला हर्षित चौधरी, बनावट लष्करी कार्ड, २४ महिलांना फसवले, वंदे भारतमध्ये केली होती चोरी !

माकप नेते सीताराम येचुरी यांचे निधन

“राहुल गांधी अमेरिकन खासदारांसोबतच्या बैठकीमध्ये बांगलादेशात हिंदूंच्या हत्या झाल्याचा मुद्दा उपस्थित करतील का?, असा प्रश्न मी सॅम पित्रोदा यांना विचारला. यावर सॅम पित्रोदा म्हणाले, राहुल गांधी यावर बोलतील आम्ही बोलू शकत नाही. याच दरम्यान एकच गोंधळ उडाला, हॉलमधील एका व्यक्तीने ओरडत वादग्रस्त प्रश्न असल्याचे म्हटले आणि इतरांनी देखील त्यामध्ये सहभागी होवून आवाज वाढवला.

याच वेळी राहुल गांधींच्या सहकाऱ्यांमधील एका व्यक्तीने माझा फोन हिसकावला आणि बंद करा,थांबा, मुलाखत बंद करा असा ओरडला. त्यातील अन्य एका व्यक्तीने माझा माइक हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण मी प्रतिकार केला. त्यांनी जबरदस्तीने माझा फोन घेऊन रेकॉर्डिंग थांबवण्यात यश मिळविले. या गोंधळात सॅम यांना राहुल गांधींना भेटण्यासाठी विमानतळावर नेण्यात आले.

राहुल गांधी यांच्या टीमने चार दिवस माझा मोबाईल ठेवून घेतला होता. मदतीसाठी ९११ वर कॉल करणार होतो, पण माझा मोबाईल त्यांच्याकडे जमा होता. अखेर चार दिवसानंतर मी मोबाईल घेवून हॉटेल बाहेर पडलो. बाहेर आल्यावर मी सॅम यांना काय घडले ते सांगण्यासाठी मेसेज केला. आपण दुसऱ्या दिवशी दुसरी मुलाखत रेकॉर्ड करू, असे त्यांनी सुचवले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे कधीच घडले नाही.

विशेष म्हणजे, भारताच्या वर्तमान सरकारच्या काळात पत्रकारितेचे स्वातंत्र्य कसे कमी झाले याबद्दल राहुल गांधी अमेरिकन प्रेसच्या सदस्यांशी बोलत असताना, त्यांची टीम मला गप्प करण्यात व्यस्त होती. राहुल गांधी आपल्या प्रत्येक यूएस दौऱ्यात स्वातंत्र्याचे मुद्दे मांडत असतात. पण त्यांचेच सहकारी स्वातंत्र्याच्या मुद्यांची पायमल्ली करताना दिसत आहेत.

ते पुढे म्हणाले, योगायोगाने, प्रेस क्लबच्या एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या माझ्या एका सहकाऱ्याने राहुलला हाच प्रश्न विचारला – “तो बांगलादेशातील हिंदूंच्या हत्येकडे लक्ष देईल का?” – जे नंतर आयएनसीच्या अधिकृत ट्विटर हँडलने ट्विट केले, असे पत्रकार रोहित शर्माने म्हटले आहे.

Exit mobile version