पत्रकार आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष यांनी पश्चिम बंगालमधील संदेशखालीतील महिलांना सोसाव्या लागलेल्या अत्याचाराला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. डाव्या प्रचारतंत्राचा भाग असलेल्या ‘द न्यूज मिनट’ या युट्युब चॅनलेला त्या मुलाखत देत होत्या. मुलाखत घेणारा सुदीप्तो मंडल हा देखील बंगालमधील अशा प्रकारच्या लैंगिक अत्याचाराचा आरोप करणे, हा तेथील राजकारणाचा कसा स्वभाव बनला आहे,’ असे बोलताना दिसते आहे.
‘संदेशखाली घटनेमुळे तुम्ही वादळात अडकला आहात. अशा प्रकारचे राजकारण हा संदेशखालीतील राजकारणाचा भाग बनला आहे, याबद्दल तुम्ही बोला,’ असे मोंडल बोलताना दिसत आहे. सागरिका घोष यांनी यावेळी तृणमूल काँग्रेसचे शेख शाहजहान, शिबू प्रसाद हझरा आणि उत्तम सरदार यांच्याबाबत मते मांडली.
‘प्रत्येक राजकीय पक्षात आणि प्रत्येक लोकशाही राजकीय पक्षात अशी माणसे असतात, जे पक्षाच्या यंत्रणेचा भाग असतात, मात्र पक्षाच्या विचारांशी त्यांची बांधिलकी नसते. यापैकीच व्यक्तींनी कदाचित अशा चुका केल्या असतील,’ असे घोष यात म्हणत आहेत. ‘प्रत्येक पक्षात अशा प्रकारच्या व्यक्ती असतात. सरतेशेवटी राजकीय पक्ष यावर कशी प्रतिक्रिया देत आहे, हे पाहणे महत्त्वाचे,’ असे त्या म्हणाल्या. संदेशखालीतील महिलांच्या आंदोलनावेळी पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांनी ही घटना किरकोळ असल्याचे म्हटले होते. हे विधान त्या सोयीस्कररीत्या विसरल्या असाव्या.
हे ही वाचा:
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर जल्लोष करणाऱ्याला मारहाण; ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
डेव्हिड विलीने लखनौ सुपर जायंट्सची साथ सोडली; मॅट हेन्रीची एण्ट्री
राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभेसाठी भाजपाची जाहीरनामा समिती स्थापन
काँग्रेसला दणका; आयकर विभागाकडून आणखी दोन नोटीस
हा वाद स्थानिक जमिनीच्या वादातून झाला असावा, असेही त्या म्हणाल्या. संदेशखालीतील महिलांवरील अत्याचार आणि अनेक गावकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याच्या घटना घडूनही येथील गावकरी तृणमूल काँग्रेसला मत देतील, असा विश्वास घोष यांना वाटतो. तसेच, बाहेरील शक्ती याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. सन २०१९पासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सातत्याने राज्यातील हिंसाचाराच्या घटनांना ‘बाहेरच्यांना’ जबाबदार ठरवत आहेत. त्यांनी यासाठी भाजपवर रोख केला आहे