वरिष्ठ पत्रकार अभिमन्यू शितोळे यांचे नुकतेच निधन झाले. नवभारत टाइम्स या हिंदी वर्तमानपत्रात अनेक वर्षे पत्रकार म्हणून ते कार्यरत होते. ७ मार्चला त्यांचे मुंबईत निधन झाले. शितोळे यांच्या निधनाबद्दल मुंबई हिंदी पत्रकार संघातर्फे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार २४ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजता मुंबई प्रेस क्लब, ग्लास हाऊस, आझाद मैदान येथे ही शोकसभा होईल.
हे ही वाचा:
वक्फ बोर्डाने बळकावलेल्या खासगी तसेच देवस्थानच्या जमीनी काढून घेणार
मेरीटची मागणी हा उच्चवर्णीयांचा नॅरेटिव्ह!
युवराज सिंग डब्ल्यूसीएल सीझन २ मध्ये भारताचे नेतृत्व करणार
मुंबई हिंदी पत्रकार संघाने मुंबई प्रेस क्लब, मंत्रालय तसेच विधिमंडळ पत्रकार संघाच्या वतीने ही शोकसभा ठेवली आहे. सर्व पत्रकारांनी या शोकसभेला येऊन शितोळे यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त कराव्यात अशी विनंती संघातर्फे करण्यात आली आहे.