भारतात ‘या’ लसीला मिळाली परवानगी

भारतात ‘या’ लसीला मिळाली परवानगी

संपूर्ण जग कोविड १९ महामारीचा सामना करत आहे. त्यावर लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याने जगातील विविध देश लसीकरण मोहिमेवर भर देत आहेत. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम भारतात राबवली जात आहे. भारतात उपलब्ध लसींच्या संख्येत आता आणखी एकाने वाढ झाली आहे.

आजपासून भारतामध्ये जॉन्सन अँड जॉन्सनची लस देखील उपलब्ध होणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी याबाबत ट्वीट केले आहे. जॉन्सन अँड जॉन्सनची ही लस केवळ एका मात्रेची आहे. मनसुख मांडविय यांनी ट्वीट करताना सांगितले आहे की या लसीला आपत्कालिन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता भारताकडे ५ आपत्कालिन वापरासाठीच्या लसी उपलब्ध झाल्या आहेत.

भारताची लसीकरण मोहिम जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम आहे. भारताची लसीकरण मोहिम कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींच्या सहाय्याने सुरू झाली. यामध्ये कोविशिल्ड लसीचा मोठा वाटा राहिला आहे. या दोन लसींच्या व्यतिरिक्त स्पुतनिक लसीच्या वापराला देखील मान्यता देण्यात आली आहे. त्याबरोबरच आता जॉन्सन अँड जॉन्सनच्या वापराला देखील आता परवानगी देण्यात आली आहे. भारताने आज लसीकरणामध्ये ५० कोटींचा टप्पा गाठला आहे.

हे ही वाचा:

कोविडची होणार हार, लसीकरण ५० कोटी पार

…म्हणून तेजस ठाकरेंची व्हिव्हियन रिचर्ड्स सोबत तुलना! नार्वेकरांचा खुलासा

मुंबईच्या किनाऱ्यावर आढळली धक्कादायक गोष्ट

राऊत यांचा मेजर ध्यानचंद यांच्या नावाला विरोध आहे का?

या लसींपैकी जॉन्सन अँड जॉन्सनची लस वगळता बाकी सर्व लसी दोन मात्रांच्या आहेत. कोविशिल्डच्या दोन मात्रांमधील अंतर देखील वाढवत नेण्यात आले होते. याविरूद्ध जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीची केवळ एकच मात्रा दिली जाणार आहे.

Exit mobile version