आपात्कालिन वापरासाठी जॉन्सन अँड जॉन्सनकडून देखील अर्ज

आपात्कालिन वापरासाठी जॉन्सन अँड जॉन्सनकडून देखील अर्ज

भारताच्या लसीकरण मोहिमेमध्ये सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसी वापरल्या जात आहेत. त्याबरोबरच जगातील इतर लसींचा अंतर्भाव देखील केला जाणार आहे. नोवावॅक्सने डीसीजीआयकडे लसीला मान्यता मिळावी यासाठी अर्ज केला आहे. त्याबरोबरच जॉन्सन अँड जॉन्सनने देखील आपल्या एक मात्रेच्या लसीला आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनने यापूर्वी सरकारकडे चाचणीसाठी अर्ज केला होता. परंतु त्यानंतर केंद्र सरकारने नियमांत बदल करून, नावाजलेल्या लसींना थेट मान्यतेसाठी अर्ज करण्याची परवानगी दिली. त्यामुळे जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने देखील भारतात आपल्या लसीच्या थेट वापसाठी अर्ज केला आहे.

या बाबत कंपनीकडून जाहिर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार कंपनीने ५ ऑगस्ट २०२१ रोजी भारत सरकारकडे कोविड-१९ वरील एक मात्रेच्या लसीच्या मान्यतेसाठी अर्ज केला होता.

हे ही वाचा:

काय ठरलं राज ठाकरे चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत?

इस्रोकडून नव्या उपग्रहाचे प्रक्षेपण

रेल्वे आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची

या राज्यालाही द्या, भारतीय हॉकीच्या यशाचे श्रेय!

या कंपनीच्या मते भारतामध्ये आणि संपूर्ण जगात एक मात्रेची लस आणण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. त्यासाठी बायोलॉजिकल इ. लि. या कंपनीशी असलेली भागीदारी देखील महत्त्वाची ठरणार आहे.  या कंपनीने असेही म्हटले आहे की, जगातील पुरवठा साखळीच्या दृष्टीने बायोलॉजिकल इ सोबत असलेली भागीदारी महत्त्वाची आहे. त्यासोबतच ही लस गावी, कोवॅक्स इत्यादी इतर जागतिक स्तरावरील संस्थात्मक रचनांचा देखील फायदा करून घेता येणार आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या लसीच्या मान्यतेसाठी सर्वप्रकारची आवश्यक कागदपत्रे सरकारकडे जमा करण्यात आली आहेत. कंपनीने या लसीची परिणामकारकता ८५ टक्क्यांपर्यंत असल्याचे म्हटले आहे. या लसीने कोविड-१९ विरोधातील संरक्षण लसीकरणानंतर २८ दिवसांत दाखवायला सुरूवात केली होती.

आम्ही लवकरात लवकर आमची लस भारतात उपलब्ध व्हावी आणि त्यायोगे कोविड १९ महामारी संपुष्टात यावी यासाठी भारत सरकारसोबत चर्चा करण्यास उत्सुक असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.

Exit mobile version