26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांनंतर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त शोध मोहिमेला वेग

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांनंतर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त शोध मोहिमेला वेग

तंगमर्ग आणि जम्मू- काश्मीरच्या अनेक भागांमध्ये शोध मोहीमेला सुरुवात

Google News Follow

Related

जम्मू काश्मीरच्या गुलमर्ग भागात लष्करी वाहनावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता यात दोन जवान हुतात्मा झाले होते तर लष्कराचे दोन पोर्टरही ठार झाले होते. गुलमर्गमधील दहशतवादी हल्ल्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कर आणि पोलिसांनी संयुक्तपणे त्यांची शोधमोहीम राबवण्याला सुरुवात केली आहे.

दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर लष्कराकडून तंगमर्ग आणि जम्मू- काश्मीरच्या अनेक भागांमध्ये शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. २४ ऑक्टोबर रोजी गुलमर्गजवळ दहशतवाद्यांनी लष्करी वाहनावर केलेल्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा झाले आणि दोन नागरी पोर्टर मारले गेले. यापूर्वी २० ऑक्टोबर रोजी, गांदरबल जिल्ह्यातील श्रीनगर- लेह राष्ट्रीय महामार्गावरील बोगद्याच्या बांधकामाच्या जागेवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक डॉक्टर आणि सहा बांधकाम कामगार ठार झाले होते. मजूर आणि इतर कर्मचारी गुंड, गंदरबल येथील त्यांच्या छावणीत परतले असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेली ही टार्गेट किलिंग असल्याने या घटनेने गंभीर चिंता व्यक्त केली. किमान दोन असल्याचे समजलेल्या दहशतवाद्यांनी मजुरांच्या गटावर अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात स्थानिक आणि गैर-स्थानिक लोकांचा समावेश होता.

बुधवारी, जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी पोलिसांना जम्मू- काश्मीरमधील प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्प आणि बांधकाम शिबिरांच्या आसपास सुरक्षा उपाय कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी पायाभूत सुविधा प्रकल्प, मोक्याच्या ठिकाणी २४ तास नाके, रात्रीची गस्त यांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देश दिले. एलजी सिन्हा यांनी गुलमर्गच्या बुटापाथरी भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सैनिकांना आणि पोर्टर्सना श्रद्धांजली वाहिली.

हे ही वाचा : 

ठाकरे गटानंतर काँग्रेसचीही दुसरी यादी जाहीर; एकूण ७१ जागांवर दिले उमेदवार

पूर्व लडाखमधील डेपसांग आणि डेमचोकमध्ये लष्करी संरचना हटवण्यास सुरुवात

माविआमधील जागवाटपाच्या धुसपुशीत ठाकरे गटाचे ८० उमेदवार जाहीर, ६५ नंतर आणखी १५ घोषित

इस्रायलचा इराणवर हवाई हल्ला; लष्करी तळांना लक्ष्य केले

दरम्यान, काउंटर इंटेलिजन्स काश्मीरने (सीआयके) खोऱ्यातील सहा जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई केली आणि दहशतवादी संघटनेशी संबंधित भरती करणाऱ्यांना पकडले. काउंटर इंटेलिजन्स युनिटने माहिती दिली की, श्रीनगर, गांदरबल, पुलवामा, अनंतनाग, बडगाम आणि कुलगाम या जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यात आले. ‘तेहरिक लबैक या मुस्लिम’ (TLM) नावाच्या नव्याने स्थापन झालेल्या दहशतवादी संघटनेचे भरती मॉड्यूल नष्ट करण्यात सुरक्षा दलाला यश आले. ही ‘लष्कर-ए-तोयबा’ची (एलईटी) एक शाखा असल्याचे म्हटले जाते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा