कर्करोगग्रस्त अभिनेता ज्युनियर मेहमूदची जॉन लिव्हरने घेतली भेट

भेटीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

कर्करोगग्रस्त अभिनेता ज्युनियर मेहमूदची जॉन लिव्हरने घेतली भेट

सर्वांना ज्युनिअर मेहमूद म्हणून परिचित असलेला लोकप्रिय अभिनेता सध्या गंभीर अवस्थेत आहे. त्यांना पोटाचा कर्करोग झाला असून तो चौथ्या स्टेजचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते आजारी असल्याची माहिती त्यांचे निकटचे मित्र सलाम काझी यांनी दिली. सुरुवातीला त्यांना छोटेमोठे त्रास होत होते, मात्र नंतर त्यांचे वजन झपाट्याने उतरू लागले. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर त्यांना कॅन्सर असल्याचे समजले. त्यांच्या आजाराबाबत समजल्यानंतर विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर यांनी ज्युनिअर मेहमूद यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.

‘ते दोन महिन्यांपासून आजारी होते. त्यांना काही छोटेमोठे आजार झाले असतील या समजाने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र वैद्यकीय अहवाल आल्यानंतर त्यांचे यकृत आणि आतड्याला कर्करोग असल्याचे आणि पोटात गाठ असल्याचे आढळले. त्यांना काविळही झाली होती. उपचार सुरू असले तरी त्यांना चौथ्या स्टेजचा कॅन्सर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे,’ अशी माहिती त्यांचे मित्र सलाम काझी यांनी दिली.

हे ही वाचा:

एक अकेला, सब पर भारी’ स्मृती इराणीकडून ट्विट!

मिर्झापुरचा कुख्यात दरोडेखोर मुंबईत जेरबंद!

मुंबई विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात उलगडला सावित्रीबाई फुले यांचा जीवनप्रवास

बुद्धिबळ स्टार प्रज्ञानंद आणि वैशालीने केली कमाल!

 

त्यांच्या आजाराबाबत कळताच जॉनी लिव्हर यांनी त्यांची तातडीने घरी भेट घेतली. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ज्युनिअर मेहमूद आराम करत असून त्याच्या बाजूला जॉनी लिव्हर बसले असल्याचे दिसत आहे.
ज्युनिअर मेहमूद यांचे खरे नाव नईम सईद आहे. ६० आणि ७०च्या दशकात त्यांनी बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांत कामे केली. ब्रह्मचारी, दो रास्ते, कटी पतंग, घर-घरकी कहानी, आन मिलो सजना हे त्यांचे काही प्रमुख चित्रपट. त्यांनी सुमारे २६५ चित्रपटांत भूमिका साकारल्या. अभिनयासह त्यांनी सहा मराठी चित्रपटांचीही निर्मिती केली.

Exit mobile version