जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने बेबी पावडरचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या पावडरमुळे महिला आणि मुलांना धोका असल्याचा आरोप अनेक महिलांनी केला असल्याने ही पावडर बंद होणार आहे.
२०२३ पर्यंत कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचे उत्पादन आणि जागतिक बाजारपेठेतील विक्री बंद करणार आहे. लहान मुलांनासाठी या पावडरचा मोठ्या प्रमाणार वापर केला जातो. सोबतच अनेक महिला देखील या पावडरचा वापर करतात. या पावडरमुळे कर्करोगाचा धोका असल्याचे आरोप करण्यात आले होते. या बेबी पावडरच्या वापरामुळे गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचा आरोपही काही महिलांनी केला आहे. न्यायालयात याविरोधात अनेक खटलेसुद्धा दाखल झाले आहेत.
अमेरिकन न्यायालयात जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीविरोधात २२ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. न्यायालयने कंपनीविरोधात निकाल देत जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला २०० कोटी डॉलरचा दंड ठोठावला होता. या आरोपांमुळे कंपनीच्या उत्पादनाच्या विक्रीमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठी घट झाली आहे.
हे ही वाचा:
कुर्ल्याचे दोघे मिठी नदीत बुडाले
‘जैश-ए-मोहम्मद’च्या उपप्रमुखाला काळ्या यादीत टाकण्यावर चीनची आडकाठी
धनुष्यबाणाच्या लढाईची कागदपत्रे सादर करा
उरी हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा कट लष्कराने उधळला
त्यामुळे मग कंपनीने उत्पादनांची मागणी आणि ग्राहकांचा कल या घटकांचा अभ्यास केला आणि जागतिक बाजारपेठेत बेबी पावडरचं उत्पादन आणि विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, २०२० मध्ये जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची बेबी पावडर कर्करोगास कारणीभूत घटक असल्याचा आरोप करण्यात आला. कंपनीविरोधात हजारो खटले दाखल करण्यात आले. त्यामुळे कंपनीने अमेरिका आणि कॅनडामधून बेबी पावडरचं उत्पादन बंद केलं होते.