अमेरिकेच्या तंत्रज्ञान विश्वातील उद्योजक आणि अँटीव्हायरस क्षेत्रातील गुरु तसंच मॅकॅफीचे संस्थापक जॉन मॅकॅफी हे स्पेनमधील तुरुंगात मृतावस्थेत आढळले. बार्सिलोनामधील एका तुरुंगात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. नऊ महिने तुरुंगात राहिल्याने ते निराश झाले होते, अशी माहिती त्यांचे वकील झेवियर विलाब्ला यांनी दिली. स्पेनमधील हायकोर्टाने नुकतीच जॉन मॅकॅफी यांच्या अमेरिकेला प्रत्यार्पण करण्याला मंजुरी दिली होती.
७५ वर्षीय जॉन मॅकॅफी यांनी जगातील पहिलं कमर्शिअल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर ‘मॅकॅफी’ बनवलं होतं. “जर मला अमेरिकेत दोषी ठरवलं तर संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवावं लागेल,” असं त्यांनी मागील महिन्यात कोर्टातील सुनावणीदरम्यान म्हटलं होतं. “स्पॅनिश कोर्टाला हा अन्याय दिसेल अशी मला आशा आहे. अमेरिका मला एका उदाहरणाप्रमाणे वापरु इच्छतो,” असं ते म्हणाले होते.
जॉन मॅकॅफी अनेक वर्षांपासून अमेरिकेच्या प्राधिकरणांपासून पळ काढत आहेत. काही काळ ते आपल्या यॉटवरही राहिले. मॅकॅफी यांच्यावर करचोरीचा आरोप आहे. टेनेसी आणि क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
हे ही वाचा:
नवी मुंबई विमानतळ, भूमिपुत्रांचे घेराव आंदोलन सुरु
ठाकरे सरकारमध्ये ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय
कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ
ऑनलाईन अध्यापनासाठी गुगलला अधिक पसंती
मागील वर्षी ३ ऑक्टोबर रोजी जॉन मॅकॅफी यांना बार्सिलोना विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आलं होतं. ब्रिटिश पासपोर्ट वापरुन ते इस्तांबूल जात होते.