जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला मिळाल्या पहिल्या महिला कुलगुरू

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला मिळाल्या पहिल्या महिला कुलगुरू

भारतातील प्रसिद्ध अशा जवाहरलाल नेहरू विद्यापिठाला त्यांच्या पहिल्या महिला कुलगुरू मिळाल्या आहेत. शांतीश्री पंडित या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू असतील. सोमवार, ७ फेब्रुवारी रोजी पंडित यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे.

आज पासून शांतीश्री पंडित या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू असणार आहेत. लवकरच त्या कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारतील. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या संबंधीची घोषणा केली आहे. या आधी पंडित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू राहिल्या आहेत.

हे ही वाचा:

…आणि चीनने पाकिस्तानला एक दमडीही दिली नाही

कर्नाटकातील शाळांमध्ये हिजाब विरुद्ध भगवा वाद

राज्यसभेत लता दीदींना वाहिली श्रद्धांजली

‘मनसुख हिरेननंतर किरीट सोमय्यांची हत्या करण्याचा ठाकरे सरकारचा डाव’

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून त्यांचा कार्यकाल हा ५ वर्षांचा असणार आहे. त्या जगदीश कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. तर जगदीश कुमार यांची विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

१९८० पासून शांतीश्री पंडित या अध्यापन क्षेत्रात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून काम करत होत्या. तर त्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थीसुद्धा राहिल्या आहेत. पंडित यांची ही नियुक्ती ऐतिहासिक असून जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे स्थापनेपासूनच्या त्या पहिल्या महिला कुलगुरू ठरल्या आहेत.

Exit mobile version