जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे तीनही टप्पे पूर्ण, सरासरी ६५ टक्के मतदान!

उधमपूरमध्ये सर्वाधिक तर बारामुल्लामध्ये सर्वात कमी मतदान

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे तीनही टप्पे पूर्ण, सरासरी ६५ टक्के मतदान!

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (१ ऑक्टोबर) शांततेत पार पडले. या टप्प्यात सात जिल्ह्यांतील ४० जागांसाठी मतदान झाले. ४१५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे.

१८ सप्टेंबर रोजी निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला होता. त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी दुसरा आणि आज शेवटचा तिसरा टप्पा पार पडला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सुमारे १० वर्षानंतर जम्मू-मध्ये निवडणुका होत असल्याने सर्वांचे लक्ष तिकडे होते. मात्र, निवडणुकीचे तीनही टप्पे शांततेत पार पडले.

आजच्या तिसऱ्या फेरीत सर्वाधिक ११ जागा जम्मू जिल्ह्यात होत्या. यानंतर, बारामुल्लामध्ये सात, कुपवाडा आणि कठुआमध्ये प्रत्येकी सहा, उधमपूरमध्ये चार आणि बांदीपोरा आणि सांबामध्ये प्रत्येकी तीन विधानसभा जागा होत्या.

हे ही वाचा : 

सहलीसाठी निघालेल्या शाळेच्या बसला आग, २४ जणांचा होरपळून मृत्यू!

तिरुपती लाडू प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपर्यंत सरकारकडून एसआयटी चौकशीला ‘फुल स्टॉप’

लैंगिक छळवणूक प्रकरणी नायर रुग्णालयातील डीनची बदली!

महाराष्ट्रात फक्त देशी गायीलाच राज्यमातेचा दर्जा का?, जर्सी गायीला का नाही?

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६५.४८ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उधमपूरमध्ये सर्वाधिक ७२.९१ टक्के मतदान झाले. तर बारामुल्लामध्ये सर्वात कमी ५५.७३ टक्के मतदान झाले. तथापि, आकडेवारीमध्ये बदल होवू शकतो.

दरम्यान, १८ सप्टेंबर रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यात ६१.३८ टक्के मतदान झाले होते, जे सात जिल्ह्यांतील एकूण २४ जागांसाठी होते. त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या दुसऱ्या टप्प्यात सरासरी ५७.३१ टक्के मतदान झाले होते, जे सहा जिल्ह्यांतील २६ जागांसाठी होते. आजच्या शेवटच्या टप्प्यात सरासरी ६५ टक्के मतदान झाले, जे सात जिल्ह्यांतील ४० जागांसाठी होते. तीनही टप्पे पार पडले असून मतमोजणी ८ ऑक्टोबरला होणार आहे.
Exit mobile version