28 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
घरविशेषजम्मू-काश्मीर निवडणुका: भाजपकडून ६ वी यादी जाहीर !

जम्मू-काश्मीर निवडणुका: भाजपकडून ६ वी यादी जाहीर !

१० उमेदवारांची नावे समोर

Google News Follow

Related

भाजपने रविवारी (८ सप्टेंबर) जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे. पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या सहाव्या यादीत १० उमेदवारांची नावे आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांना त्यांच्या गांधी नगर मतदारसंघातून वगळण्यात आले आहे. गांधी नगरमध्ये (बहू ) आता विक्रम रंधावा यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.

या यादीत आरएस पठानिया हे उधमपूर पूर्वमधून तर नसीर अहमद लोन बांदीपोरामधून निवडणूक लढवणार आहेत. कर्नाळ जागेवरून मो. इद्रिस कर्नाही यांना तिकीट देण्यात आले आहे. गुलाम मोहम्मद मीर हे हंदवाडा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार असतील. फकीर मोहम्मद खान गुरेझमधून निवडणूक लढवणार आहेत. तसेच अब्दुल रशीद खान हे  सोनावरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

हे ही वाचा : 

दिव्यांग खेळाडूंनी केला भीमपराक्रम; पॅरालिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके !

मणिपूरमध्ये कोम्बिंग ऑपरेशन, दारुगोळ्याचा मोठा साठा जप्त !

बांगलादेशी घुसखोर बेंगळुरूत घुसणार होते; पण त्रिपुरातच अटक !

महावीर फोगाट म्हणतात, विनेशने भाजपात प्रवेश करायला हवा होता!

डॉ.भारतभूषण कठुआ मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून, राजीव भगत यांना बिश्नाहमधून तिकीट मिळाले आहे. सुरिंदर भगत यांना पक्षाने मढमधून उमेदवारी दिली आहे. पक्षाने बहू मतदारसंघातून विक्रम रंधावा यांना तिकीट दिले आहे. दरम्यान,  यावेळी भाजपने जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांना तिकीट दिलेले नाही. व

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये १८, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये १० वर्षानंतर पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा