जम्मू-काश्मीरचा दुसरा टप्पा पूर्ण, सरासरी ५४ टक्के मतदान!

रियासी जिल्ह्यात सर्वाधिक तर श्रीनगरमध्ये सर्वात कमी मतदान

जम्मू-काश्मीरचा दुसरा टप्पा पूर्ण, सरासरी ५४ टक्के मतदान!

जम्मू-काश्मीरच्या ऐतिहासिक तीन टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाचा दुसरा टप्पा आज (२५ सप्टेंबर) मोठ्या शांततेत पार पडला. दुसऱ्या टप्प्यासाठी सहा जिल्ह्यांतील २६ जागांसाठी आज मतदान पार पाडले. २३९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

दुसऱ्या फेरीत श्रीनगर जिल्ह्यातील आठ जागांवर मतदान झाले. यानंतर रियासीमध्ये सहा, बडगाममध्ये पाच, रियासी आणि पुंछमध्ये प्रत्येकी तीन आणि गांदरबलमध्ये दोन जागांवर मतदान झाले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये ५४ टक्के मतदान झाले. सर्वाधिक ७१.८१  टक्के मतदान रियासी जिल्ह्यात तर सर्वात कमी २७.३१ टक्के मतदान श्रीनगर जिल्ह्यात झाले. दुसऱ्या टप्प्यात रियासी जिल्ह्यातील श्री माता वैष्णोदेवी मतदारसंघात सर्वाधिक ७५.२९ टक्के मतदान झाले. तथापि, आकडेवारीमध्ये बदल होवू शकतो.

हे ही वाचा : 

उमराह व्हिसाच्या नावाखाली भिकाऱ्यांना पाठवणे थांबवा, सौदी अरेबियाचा पाकिस्तानला इशारा!

हिमाचलमधील काँग्रेस सरकारलाही झाली पश्चातबुद्धी; दुकानांवर आता मालकांची नावे!

३ हजार वाहने, १२ हजारांचा जमाव घेऊन जलील आलेच कसे? चौकशी करा!

भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला १० वर्ष पूर्ण!

दरम्यान, यापूर्वी १८ सप्टेंबर रोजी निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला होता. त्यावेळी किश्तवाडमध्ये सर्वाधिक तर पुलवामामध्ये सर्वात कमी मतदान झाले होते. आतापर्यंत दोन टप्पे पार पडले असून ४० जागांसाठी तिसरा आणि शेवटच्या मतदानाचा टप्पा १ ऑक्टोबरला पार पडणार आहे. यासह मतमोजणी ८ ऑक्टोबरला होणार आहे.

Exit mobile version