भूसुरुंग स्फोटात सुरक्षा जवान हुतात्मा!

पुंछमध्ये गस्ती दरम्यान घडली घटना

भूसुरुंग स्फोटात सुरक्षा जवान हुतात्मा!
जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील सब्जियान सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर तैनात असलेले लष्कराचे हवालदार सुबैय्या व्हीव्ही यांनी सोमवारी (९ डिसेंबर) आपल्या प्राणांची आहुती दिली. दुपारी ३.४५ च्या दरम्यान नियंत्रण रेषेजवळ गस्त घालत असताना जवानाचा पाय भूसुरुंगावर पडला आणि स्फोट झाला.

या स्फोटात जवान सुबैय्या व्हीव्ही गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित लष्करी वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले, मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. जवान सुबैय्या व्हीव्ही हे लष्कराच्या ९-मद्रास रेजिमेंटमध्ये सामील झाले होते आणि सध्या ते २५ राष्ट्रीय रायफल बटालियनमध्ये सब्जियान सेक्टरमध्ये तैनात होते. हुतात्मा जवान चेन्नईच्या वरिकुंटा येथील रहिवासी आहेत.

दरम्यान, दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी लष्कराने नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंग पेरली आहेत. पावसाळ्यात अनेक वेळा हे भूसुरुंग इकडे तिकडे सरकतात. त्यामुळे याचा शोध लागला नाहीतर असे अपघात होतात.
हे ही वाचा : 
वक्फ बोर्डचा मनमानी कारभार, देशातील ९९४ मालमत्ता गिळल्या!
कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर ‘या’ बेस्ट बसेसचा मार्ग बदलला
कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत
श्रीलंकेच्या नौदलाने अटक केलेले २१ भारतीय मच्छिमार मायदेशी परतले

 

Exit mobile version